पॅन कार्ड (Pan Card) आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. पण आता आधार-पॅन कार्ड लिंक (Aadhar-Pan Card Link) करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.
29 मार्च 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये CBDT ने म्हटले होते की, 31 मार्च 2022 नंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 500 रुपये दंड भरावा लागेल. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने 30 जून 2022 पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर त्याला 500 रुपयांऐवजी अधिक दंड भरावा लागेल.
30 जूनपर्यंत 500 रुपये दंड
CBDT ने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की जर करदात्यांनी 30 जून 2022 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले तर त्यांना 500 रुपये दंड भरावा लागेल.
1 जुलैपासून दंड वाढणार आहे
1 जुलै किंवा त्यानंतर ज्या करदात्यांनी त्यांचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक केले त्यांना 500 रुपयांऐवजी 1000 रुपये दंड भरावा लागेल. हे पेमेंट चलन क्रमांक ITNS 280 द्वारे केले जाईल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, जर करदात्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकले नाहीत, तर त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची प्रोसेस
»सर्व प्रथम www.incometax.gov.in वर जा.
»Quick Links विभागात, Link Aadhaar पर्यायावर जा. »त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो उघडेल.
»आता तुमचा पॅन, आधार नाव आणि मोबाईल नंबर तपशीलांसह शेअर करा.
»सर्व माहिती अचूक भरल्यानंतर, 'I Validate My Aadhaar Details' या पर्यायावर जा आणि Continue या पर्यायावर क्लिक करा.
»तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते बरोबर भरा आणि Validate वर क्लिक करा. त्यानंतर दंड भरावा. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचा पॅन आणि आधार लिंक केला जाईल.
Published on: 02 June 2022, 06:04 IST