Others News

बरेचजण काहीतरी व्यवसायाच्या शोधात असतात. परंतु कोणता व्यवसाय करावा या बाबतीत बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम असतो. अशा व्यक्तींसाठी हा लेख खूप महत्त्वाचा ठरू शकतो. केंद्र सरकारच्या मदतीने तुम्हाला चांगली कमाई करण्याची संधी निर्माण केली जात आहे. याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

Updated on 24 July, 2022 5:34 PM IST

बरेचजण काहीतरी व्यवसायाच्या शोधात असतात. परंतु कोणता व्यवसाय करावा या बाबतीत बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम असतो. अशा व्यक्तींसाठी हा लेख खूप महत्त्वाचा ठरू शकतो. केंद्र सरकारच्या मदतीने तुम्हाला  चांगली कमाई करण्याची संधी निर्माण केली जात आहे. याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 जनऔषधी केंद्र उघडा कमवा पैसे

 केंद्रसरकार जेनेरिक औषधे पुरवण्यासाठी जन औषधी केंद्र अर्थात प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र उघडण्याची संधी देत आहे.

यासाठी सरकारकडून मदत देखील करण्यात येत आहे. जनऔषधी केंद्रची संख्या वाढावी यावर सरकारचा भर असून सरकारने मार्च 2024 पर्यंत देशभरात प्रधानमंत्री जन औषधि केंद्रांची संख्या दहा हजार पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे

. हे जन औषधी केंद्र उघडण्यामागचा उद्देश म्हणजे सर्वसामान्यांसाठी औषधांच्या किमतीचा भार कमी व्हावा यासाठी औषधी केंद्रे उघडण्यात येत आहेत.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो लखपती बनायचंय ना! तर बाजारात प्रचंड मागणी असणारा हा शेतीव्यवसाय कराच...

 कुणाला उघडता येते जनऔषधी केंद्र?

 जन औषधी केंद्र उघडण्यासाठी सरकारने तीन श्रेण्या तयार केले आहे. यामध्ये पहिल्या श्रेणीत कोणतीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय तसेच दुसरे श्रेणीत एनजीओ, ट्रस्ट,

खाजगी रुग्णालये इत्यादी तर तिसरा श्रेणीत राज्य सरकारांनी नामनिर्देशित केलेल्या एजन्सीजना संधी मिळते. जर तुम्हाला जन औषधी केंद्र उघडायचे असेल तर तुमच्याकडे डी फार्म किंवा बी फार्म मधील पदवी असणे आवश्यक आहे.

यासाठी तुम्हाला अर्ज सादर करताना पदवी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात. PMJAY अंतर्गत जन औषधी केंद्र उघडण्यासाठी एससी, एसटी आणि अपंग अर्जदारांना पन्नास हजार पर्यंत औषध आगाऊ रक्कम दिली जाते.

नक्की वाचा:काय म्हणता! शेणापासून सुरू करता येतात एवढ्या प्रकारचे व्यवसाय आणि मिळवता येतो चांगला पैसा, वाचा यादी

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

 जर तुम्हाला जन औषधी केंद्र उघडायचे असेल तर सर्वप्रथम जन औषधी केंद्रच्या नावाने किरकोळ औषध विक्रीचा परवाना घ्यावा लागतो.

त्यासाठी तुम्हाला  अधिकृत संकेतस्थळ https://janaushadi.gov.in/ यावरून तुम्हाला फार्म डाऊनलोड करून तुम्हाला तुमचा अर्ज ब्युरो ऑफ फर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजर कडे पाठवावा लागतो.

 यामधून किती कमवू शकतात?

 औषधी केंद्रांच्या माध्यमातून जे काही औषधे विकली जातात त्या औषधांच्या विक्रीवर वीस टक्के कमिशन मिळते. तसेच या कमिशन व्यतिरिक्त तुम्हाला दर महिन्याला केलेल्या विक्रीवर 15 टक्‍क्‍यांपर्यंत वेगळे प्रोत्साहन दिले जाते.

तसेच या योजनेअंतर्गत दुकान उघडण्यासाठी फर्निचर आणि इतर वस्तूंसाठी सरकारकडून दीड लाख रुपयांची तरतूद देखील केली जाते  तसेच लागणारे संगणक आणि प्रिंटर खरेदी करायचे असेल तर 50 हजार रुपयांपर्यंत सरकार मदत करते.

नक्की वाचा:Farming Buisness Idea : शेतकरी असाल तर व्हाल करोडपती! शेतात लावा ही झाडे आणि कमवा करोडो

English Summary: open janaushadi center with goverment help and earn more profit
Published on: 24 July 2022, 05:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)