सध्याची परिस्थितीमध्ये अनेक सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात इकडेतिकडे फिरत आहेत. ग्रामीण भागातील तरुणांची देखील अशीच स्थिती आहे. जरी काम मिळाले तरी शिक्षणाच्या योग्यतेनुसार ते मिळत नाही. त्यामुळे बर्याच तरुणांमध्ये वैफल्यता येते.
परंतु यासाठी केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत योजना राबवत असून या योजनेअंतर्गत देशातील लाखो सुशिक्षित बेरोजगारांना विविध क्षेत्रांमध्ये वाढत्या कमाईची संधी दिली जात आहे.
जरी तुमचे शिक्षण कमी राहिले तरी कुठलेही टेन्शन घ्यायचे कारण नाही. तुम्ही तुमच्या गावात राहून केंद्र सरकारच्या सीएससी योजनेच्या आधारे तुमच्या स्वप्न साकार करू शकतात. या योजनेच्या मदतीने तुम्ही कॉमन सर्विस सेंटर उघडू शकतात.
कॉमन सर्विस सेंटर उघडण्यासाठी आवश्यक नोंदणी
जर तुम्हाला कॉमन सर्विस सेंटर उघडायचे असेल तर तुम्हाला register.csc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन कॉमन सर्विस सेंटर साठी नोंदणी करू शकतात. केंद्र सरकारने डिजिटल इंडिया प्रोग्राम अंतर्गत ग्रामीण तरुणांना उद्यमी बनवण्यासाठी सामान्य सेवा केंद्र योजना सुरु केली आहे.
ही योजना सरकार देशाच्या सर्व लोकांमध्ये पोहचण्यासाठी इच्छुक आहे. कॉमन सर्विस सेंटर हे एक छोटे सायबर्कॅफे सारखे असते. याठिकाणी कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारची सेवा लोकांना देता येते.
यामध्ये ऑनलाईन कोर्स, कृषी सेवा, ई-कॉमर्स सेल, भारतीय रेल्वे, विमान प्रवास, बस इत्यादींचे तिकीट बुक करणे, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करणे इत्यादी सेवा देतात.
कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून लोकांचे पॅन कार्ड, पासपोर्ट, बँकिंग सर्विस बुक, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, आधार आणि प्रिंटिंग, पेन्शन सर्विस, इन्शुरन्स सर्विस इत्यादी विविध प्रकारची कामे या माध्यमातून करता येतात.
जर तुम्हाला कॉमन सर्विस सेंटर उघडायचे असेल तर तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमची स्थानिक भाषा सोबतच हिंदी आणि इंग्रजी चे नाममात्र ज्ञान आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या स्वतःचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे देखील गरजेचे आहे.
नक्की वाचा:ऑइल मिल व्यवसाय: अशाप्रकारे तेल व्यवसाय सुरु करा आणि कमवा बक्कळ नफा
कॉमन सर्विस सेंटरसाठी आवश्यक साधने
कॉमन सर्विस सेंटर उघडण्यासाठी तुमच्याजवळ 100 ते 200 चौरस फूट खाली जागा असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या जवळ कमीत कमी दोन कम्प्युटर आणि पावर बँक असणे गरजेचे आहे. तसेच एक प्रिंटर आणि इंटरनेट कनेक्शन लागते.
तसे पाहायला गेले तर कॉमन सर्विस सेंटर उघडण्यासाठी अधिक पात्रतेची आवश्यकता नाही परंतु जर तुम्ही टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग सेंटर प्रमाणपत्र प्राप्त केले असेल तर तुमच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरते. त्यानंतर तुम्हाला कॉमन सर्विस सेंटर उघडण्यासाठी लायसन्स देखील घ्यावी लागते.
नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो; जनावरांना सर्पदंश झालाय? तर करा त्वरित 'हे' उपाय, अन्यथा...
Published on: 16 July 2022, 03:47 IST