सध्या बाजारामध्ये विविध कंपन्यांचे विविध प्रकारचे आरोग्यविषयक तसेच अपघात विमा योजना आहेत. परंतु त्यांचे इंस्टॉलमेंट हे बऱ्याचदा आवाक्याबाहेरचे असतात.त्यामुळे प्रत्येकालाच अशी विमा पॉलिसी घेणे परवडत नाही. त्यामुळे बऱ्याच प्रकारची समस्या निर्माण होते म्हणून या समस्येवर उपाय म्हणून सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना सुरु केली आहे
या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी निव्वळ बारा रुपये भरून अपघात विमा मिळवता येऊ शकतो व त्याद्वारे आपल्याला अपघात पासून संरक्षण मिळते.
या योजनेची सुरुवात 28 फेब्रुवारी 2015 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वार्षिक अर्थसंकल्प 2015- 16 मध्ये केली होती.या योजनेचा प्रमुख उद्देश आहे की ज्या लोकांकडे विमा संरक्षण नाही अशा लोकांना विमा प्रदान करणे हे होय.पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत बारा रुपयांचा वार्षिक प्रिमियम वर अपघात विमा केला जातो. एक अपघात विमा पॉलिसी असून याअंतर्गत अपघातामध्ये मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याच्या रक्कमेवर दावा केला जाऊ शकतो. या विमा अंतर्गत अपघातामध्ये मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास संरक्षण विमा कवच म्हणून दोन लाख रुपये मिळतात.
या योजनेसाठी असलेल्या अटी
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 70 वर्षे आहे.
- यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.
- एखाद्याकडे एक किंवा अधिक बँकेत बचत खाते असतील तर ते कोणत्याही एका बचत खात्या द्वारे या योजनेत समाविष्ट होऊ शकतात.
- या योजनेसाठी लाभार्थ्याला वर्षाला फक्त बारा रुपये भरावे लागतात जे बँकेद्वारे थेट खात्यातून कट होतात.
अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर खातेदार धारकाने त्याच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधा वर लॉग इन करावे. जिथे तुमच्या सेविंग अकाउंट आहे. एका बँक अकाउंट एकच व्यक्ती लाभ देऊ शकतो. या योजनेअंतर्गत एक वर्षाची विमा कव्हर मिळते. त्याचा कालावधी हा एक जून ते 31 मे पर्यंत आहे. दरवर्षी बँकेमार्फत नूतनीकरण करावे लागते. भारताच्या बँक खात्यातून दरवर्षी एक जून रोजी किंवा त्यापूर्वी ऑटो डेबिट सेवेद्वारे कापून घेतलेल्या सर्व करा सह योजनेतील प्रीमियमची रक्कम प्रति वर्ष 12 रुपये आहे.
Published on: 15 December 2021, 10:55 IST