ई-पीक पाहणीचा उपक्रम खरीप हंगामापासून राबिवला होता तो लाखो शेतकऱ्यांचा झाला होता. शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंदणी माझी शेती, माझा सातबारा अन् माझ पीक या घोषवाक्यानुसार केली होती. या उपक्रमाला १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरू झाली होती. खरीप हंगामात जवळपास ९८ लाख शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळाली आहे. खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात सुद्धा हा उपक्रम राबिवण्यात येणार आहे. रब्बी हंगामातील पिकांची नोंद ई-पीक पाहणीद्वारे करायची असेल तर १५ फेब्रुवारी पर्यंत अंतिम मुदत आहे. जे शेतकरी या अंतिम तारखेच्या आत आपली नोंद करतील त्यांनाच नुकसानभरपाई मिळेल.
अॅप अपडेट प्रक्रिया मात्र तीच :-
रब्बी हंगामात ज्या पिकांचा पेरा केला आहे त्या पिकांची नोंद करायची असेल तर "ई-पीक पाहणी" या अॅपद्वारे करावी लागणार आहे. खरीप हंगामात याची जणजागृती कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून करावी लागली होती. रब्बी हंगामातील पिकांची नोंद करायची असेल तर नवीन अॅप घ्यावे लागणार आहे कारण तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी अॅप अपडेट केले गेले आहे. या उपक्रमामुळे आता शेतकऱ्यांना तलाठ्याची वाट पहावी लागणार नाही तर शेतकरी स्वतः सातबारा उतारा वर पिकांची नोंद करतील. भविष्यात पिकांचे नुकसान झाले तर याद्वारे नुकसानभरपाई भेटणार आहे.
रब्बी हंगामातील पिकांच्या नोंदी :-
यंदा पाऊसामुळे पेरण्या उशिरा झालेल्या आहे पण रब्बी हंगामातील पिके जोमात वाढलेली आहेत. त्यामुळे पिकांची नोंद करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली होती. १५ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची नोंद करायची असेल तर दोन च दिवस राहिले आहेत. रब्बी हंगामात हरभरा, गहू, राजमा, ज्वारी या पिकांचा पेरा करण्यात आला आहे. निसर्गाचा लहरीपणामुळे काय परिणाम होतो याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहेच त्यासाठी आता नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झाले तर नुकसानभरपाई भेटेल.
नोंदणी यशस्वी झाली की पुन्हा ते App बमद करून चालू करा. App चालू केले की तुमचे नाव निवडा आणि आलेला पासवर्ड टाका. त्यानंतर तुमचा फोटो अपलोड करा आणि विचारलेली माहिती सबमिट करा. होम मध्ये येऊन पिकाची नोंदणी असा फॉर्म दिसेल तिथे खातेक्रमांक, गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र किती हेक्टरमध्ये आहे ते निवडा त्यानंतर पीक क्षेत्र किती आहे त्याचा उल्लेख करा.पिकाच्या वर्गात जाऊन तुमचे पीक निवडा आणि पुन्हा क्षेत्र भरा. यानंतर सिंचनाचे साधन म्हणजे ठिबक पद्धती कशी आहे ते पर्यायातून निवडावे. त्यानंतर पीक कधी लावले त्याची तारीख नोंद करा. नंतर कॅमेरा चा पर्याय दिसेल तो ओपन करून फोटो काढून सबमिट करा. जी माहिती भरलेली आहे ती सर्व्हर ला पाठवायची आहे ती अपलोड अशी करावी.
Published on: 15 February 2022, 11:25 IST