Others News

या महागाईच्या काळात जर आपल्याला नौकरी परवडत नसेल आणि व्यवसाय करू इच्छित असाल पण आपल्याला बिजनेसची कल्पना सुचत नसेल तर डोन्ट वरी आम्ही आज आपल्यासाठी अशा एका व्यवसायाची कल्पना घेऊन आलो आहोत, जो की कमी भांडवलात सुरु करता येऊ शकतो. हा व्यवसाय आपण फक्त दहा हजार रुपयात सुरु करू शकता आणि यातून तुम्ही ताबडतोब कमाई देखील करू शकता. सनासुदीच्या काळात ह्या बिजनेसची महत्वता अधिकच वाढते.

Updated on 05 December, 2021 9:21 PM IST

या महागाईच्या काळात जर आपल्याला नौकरी परवडत नसेल आणि व्यवसाय करू इच्छित असाल पण आपल्याला बिजनेसची कल्पना सुचत नसेल तर डोन्ट वरी आम्ही आज आपल्यासाठी अशा एका व्यवसायाची कल्पना घेऊन आलो आहोत, जो की कमी भांडवलात सुरु करता येऊ शकतो. हा व्यवसाय आपण फक्त दहा हजार रुपयात सुरु करू शकता आणि यातून तुम्ही ताबडतोब कमाई देखील करू शकता. सनासुदीच्या काळात ह्या बिजनेसची महत्वता अधिकच वाढते.

आम्ही ज्या बिजनेस विषयी बोलत आहोत तो बिजनेस आहे वेस्ट मटेरियल अर्थात भंगार पासून सजावटीच्या तसेच डेली वापरातल्या वस्तू बनवणे. आपण हा व्यवसाय घरातूनच सुरु करू शकता, आणि नंतर व्यवसाय ग्रो करायला लागला की आपण यासाठी गाळ्याची व्यवस्था करू शकता. चला तर मग मित्रांनो अवघ्या दहा हजारात घरातूनच सुरु करता येणाऱ्या ह्या बिजनेसविषयी माहिती जाणुन घेऊया.

 आम्ही आपणांस सांगू इच्छितो की ह्या व्यवसायाची प्रचंड डिमांड आहे शिवाय ह्या बिजनेसची आवश्यकता देखील आहे. हा व्यवसाय करून अनेक लोक चांगली मोठी कमाई करत आहेत, त्यामुळे हा व्यवसाय आपल्यासाठी देखील लाभप्रद सिद्ध होऊ शकतो.

मित्रांनो या व्यवसायाची व्याप्ती (रिसायकलिंग बिझनेस) खूप मोठी आहे. जगभरात दरवर्षी २ अब्ज टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. भारतात देखील खुप मोठया प्रमाणात वेस्ट अर्थात भंगार, कचरा निर्माण होतो, भारतात जवळपास 277 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कचरा तयार होतो

ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे सर्वात कठीण काम आहे. त्यामुळे आता लोकांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवायला सुरवात केली आहे. ह्या वेस्ट मटेरियलपासून घराच्या सजावटीच्या वस्तू, दागिने, पेंटिंग्ज अशा अनेकाअनेक वस्तू बनवल्या जातात. ह्या वस्तूपासून चांगला मोबदला मिळतो त्यामुळे या मोठ्या समस्येचे व्यवसायात रूपांतर झाले आहे, आणि या व्यवसायातून लोक लाखो रुपये कमवीत आहेत.

कसा सुरु करणार हा व्यवसाय

हा वेस्ट मटेरियलचा व्यवसाय सुरु करण्यासाठी, आपण सुरवातीला आपल्या आणि आजूबाजूच्या घराभोवती असलेल्या टाकाऊ पदार्थ वापरू शकता. हवे असल्यास आपण नगरपरिषदेकडूनही कचरा विकत घेऊन हा व्यवसाय सुरु शकता. आता अनेक लोक टाकाऊ वस्तू विक्री करतात आपण त्या खरेदी करून हा व्यवसाय स्टार्ट करू शकता. वेस्ट मटेरियल किंवा टाकाऊ सामान खरेदी केल्यानंतर, आपणांस त्या टाकाऊ वस्तू चांगल्या स्वच्छ कराव्या लागतील. मग आपण वेगवेगळ्या वस्तू डिझाईनिंग आणि कलरिंग करून बाजारात विक्रीसाठी नेऊ शकता.

काय काय बनवले जाते टाकाऊ वस्तूपासून

आपण टाकाऊ पदार्थांपासून अनेक सजावटीच्या तसेच डेली वापरातल्या वस्तू बनवू शकता. उदाहरणार्थ, टायर्सपासून बसण्याची खुर्ची बनवता येते. Amazon वर ह्या खुर्चीची किंमत 700 रुपयाच्या आसपास आहे. याशिवाय आपण टाकाऊ वस्तूपासून कप, वुडन क्राफ्ट, किटली, काच, कंगवा आणि इतर गृहसजावटीच्या वस्तूही बनवु शकता. या व्यवसायाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मार्केटिंगचा भाग.  आपण तयार प्रॉडक्ट्स ई-कॉमर्स कंपनी Amazon आणि Flipkart वर देखील विकु शकता. आपण तयार वस्तू ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर विकू शकता.

 महिन्याला दहा लाखापर्यंत कमाई होऊ शकते

एका न्युजसाईट मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, The Kabadi.com स्टार्टअपचे मालक, शुभमने हा व्यवसाय एक रिक्षा आणि तीन माणसांसमवेत सुरु केला होता. जेव्हा शुभमने हा व्यवसाय सुरू केला तेव्हा ते घरोघरी जाऊन वेस्ट मटेरियल/ कचरा विकत घेऊ लागले. आज त्यांची एक महिन्याची उलाढाल आठ ते दहा लाख रुपयांवर पोहोचली आहे. असे सांगितलं जाते की शुभमची कंपनी आज एका महिन्यात 40 ते 50 टन कचरा उचलते. ही कंपनी फक्त दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आली होती आणि फक्त चार जणांसह सुरू झाली होती, आज या कंपनीत 28 जणांना रोजगार मिळाला आहे. आपण देखील हा व्यवसाय सुरु करून लाखोंची कमाई करू शकतात.

English Summary: only 10 thosand rupees investment for recycle bussiness
Published on: 05 December 2021, 09:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)