एअर फोर्स नंतर आता लष्कराने देखील सोमवारी अग्नीपथ योजनेच्या माध्यमातून भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जुलैपासून यासाठीची नोंदणी सुरू होणार असून या अधिसूचनेनुसार, आठवी आणि दहावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना देखील या अंतर्गत अर्ज करता येणार आहे.
याआधी सुचने मध्ये पात्रता अटी, भरतीची प्रक्रिया तसेच मिळणारे वेतन आणि सेवा नियमांचे भत्ते यांचा तपशील आहे. ज्या तरुणांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करायची असेल त्यांनी joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
यादी सूचनेनुसार भरतीसाठी जुलैपासून नोंदणी करता येईल. अग्निविर आला सैन्यात वेगळे पद असेल, असेलष्कर आणि स्पष्ट केले आहे. यामध्ये पाच ग्रेड असून अग्निविर जनरल ड्युटी, अग्निविर तांत्रिक, अग्निविर लिपिक, अग्निविर ट्रेड्समन ( दहावी पास ), अग्निविर ट्रेड्समन ( आठवी पास)
अग्नीवीरांना लष्करात मिळतील या सुविधा
1- यामध्ये अग्नी वीरांच्या युनिफॉर्म वर एक विशिष्ट चिन्ह असेल ते त्यांना इतर सैनिकांपेक्षा वेगळे करेल. जे उमेदवार 18 वर्षापेक्षा कमी असतील अशा उमेदवारांना अर्ज करताना त्यांच्या पालकांची परवानगी घेऊनच या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.
2- यामध्ये पगारा सोबत हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता, सीएसडी कॅन्टीन सुविधा आणि मेडिकल तसेच प्रवास भत्ता देखील मिळू शकेल.
3- तसेच वर्षातून 30 दिवस सुट्टी असेल. यामध्ये मेडिकल रजा वेगळी असेल.
4- सर्व अग्नी वीरांना 48 लाखांचे विमा संरक्षण मिळेल. या चार वर्षांच्या सेवेत सक्रिय कर्तव्यात देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले त्याच्या कुटुंबीयांना 48 लाखांचे विमा संरक्षण तसेच सरकारकडून 44 लाखांचे अनुदान मिळेल.
5- तसेच त्यांच्या कुटुंबाला सर्विस फंड पॅकेज आणि उर्वरित नोकरीचा पूर्ण पगार म्हणून अकरा लाख रुपये मिळतील. असे एकूण एक कोटी कुटुंबाला मिळणार आहेत.
6- शत्रूविरुद्ध शौर्य आणि पराक्रमासाठी सैनिकांना समान शौर्यपदके दिली जाते.
7- या चार वर्षाच्या सेवेच्या दरम्यान अग्निविर स्वतःच्या इच्छेने सैन्य सोडू शकणार नाही. चार वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सैन्य सोडता येईल.
परंतु काही अपवादात्मक परिस्थितीत तुम्ही तुमची सेवा मध्यभागी सोडू शकता.
8- सेवानिवृत्तीच्या चार वर्षानंतर सुमारे 10.04 लाख सेवा निधी पॅकेज म्हणून उपलब्ध होतील. सेवा निधी पॅकेज मध्ये प्रत्येक अग्निविराला त्याच्या मासिक 30000 पगाराच्या 30 टक्के रक्कम जमा करायचे आहे. आणि तीच रक्कम सरकार दरमहा जमा करेल.
9- जर एखादा अग्निविर अपवादात्मक परिस्थितीत चार वर्षं पूर्ण होण्याअगोदर सैन्यातून निवृत्त झाला तर त्याला त्याने दिलेली सेवा निधी पॅकेजचा समान भाग मिळेल. परंतु सरकारी योगदान मिळणार नाही.
नक्की वाचा:सरकारकडून महिलांना मोफत मिळत आहेत शिलाई मशीन, जाणून घ्या पात्रता..
Published on: 20 June 2022, 09:56 IST