Others News

आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन महत्वाची कागदपत्र आहेत.अनेक प्रकारच्या शासकीय योजनांसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आला आहे.पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची मुदत सरकारने31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे.अजून पर्यंत जर कोणी पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलेले नसेल तर त्याने ते लवकर करून घेणे आवश्यक आहे.

Updated on 10 October, 2021 6:55 PM IST

 आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन महत्वाची कागदपत्र आहेत.अनेक प्रकारच्या शासकीय योजनांसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आला आहे.पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची मुदत सरकारने31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे.अजून पर्यंत जर कोणी पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलेले नसेल तर त्याने ते लवकर करून घेणे आवश्यक आहे.

. बऱ्याचदा पॅन कार्ड वर काही चुका झालेल्या असतात. अशा झालेल्या चुका किंवा तपशील कसा अपडेट करायचा याबद्दल माहिती नसते. या लेखात आपण पॅन कार्ड कसे अपडेट करायचे?या बाबतीत माहिती घेऊ.

 पॅन कार्ड कसे अपडेट करायचे?

 तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दुरुस्त किंवा अपडेट करायचे असल्यास incometaxindia.gov.in या इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासंदर्भात माहिती द्यावी.पॅन कार्ड वरचा तपशील दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन पद्धती आहेत.

जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पॅन कार्ड वरचा तपशिलात दुरुस्ती करायचे असेल तर संबंधित व्यक्तीने जवळीलपॅनसुविधा केंद्रात जाऊन नव्या पॅनकार्डसाठी अर्ज किंवा पॅनवरील माहितीत बदल किंवा दुरुस्तीसाठी असलेला फॉर्म भरावा.तसेच पॅन कार्डवरील दुरुस्ती आणि माहिती अपडेट करण्यासंदर्भात व्यक्ती एनएसडीएलशी संपर्क करू शकता.

 या ठिकाणी संपर्क साधावा

 या संदर्भात व्यक्तीने आयकर विभाग किंवा एनएसडीएल यांच्याशी 18001801961 किंवा 020-27218080 या क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच efilingwebmanager@incometax.gov.inकिंवाtininfo@nsdl.co.inया ईमेलच्या माध्यमातून देखील संबंधित व्यक्ती पॅनसंदर्भातल्या अडचणींबाबत संपर्क साधू शकते. पॅन कार्ड वरचा तपशिलात बदल किंवा दुरुस्ती करताना पॅनकार्ड घेतेवेळी जी माहिती संबंधित व्यक्तीने दिली होती ते माहिती आयकर विभागाला देणे आवश्यक आहे. यासाठी नव्या पॅन कार्ड करता अर्ज किंवा पॅन कार्डवरील तपशील यात बदल किंवा दुरुस्ती साठी असलेला फॉर्म भरावा.

 

Incometaxindia.gov.in/Document/formfor-changes-in-pan-pdf  या लिंकवरून  देखील तुम्ही फार्म पीडीएफ स्वरूपात मिळू शकतात. ऑनलाइन पद्धतीने नव्या पॅनकार्डसाठी किंवा त्यात बदल व दुरुस्ती करण्यासाठी एन एस डी एल च्या onlineservises.nsdl.com/paam/endusersRegister

 किंवा युटीआयटीएसच्या

UTIITS@myutiitsl.com/PAN_ONLINE/CSFPANAppया लिंक वरच्या सुविधांचा वापर व्यक्ती करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पॅन कार्डवरील तपशील ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रियेतून सहजपणे करू शकतात.

English Summary: online process of pancard update how to do that process
Published on: 10 October 2021, 06:49 IST