Others News

माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याचे आधारे शासनाने पीकपाणी करण्याचा गेल्या 15 ऑगस्ट ला श्रीगणेशा केला. हा प्रकल्प संयुक्तपणे राज्याचा महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. सरकारच्या या प्रकल्पाला बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे.

Updated on 10 September, 2021 10:09 AM IST

 माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याचे आधारे शासनाने पीकपाणी करण्याचा गेल्या 15 ऑगस्ट ला श्रीगणेशा केला. हा प्रकल्प संयुक्तपणे राज्याचा महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. सरकारच्या या प्रकल्पाला बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे.

 पिक पाहणीच्या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरून तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी निर्माण होत असतातवपंचनामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हा सगळा त्रास आता कमी होणार आहे. या लेखात आपण ई पीक पाहणी मोबाईलमध्ये ॲप मध्ये पीकपाणी कशी नोंदवावी, याबद्दल माहिती घेणार आहोत

 आपल्या मोबाईल मध्ये इ पीक पाहणी ॲप द्वारे पिकपाणी कशी नोंदवावी?

  • सर्वप्रथम मोबाईल मधील गुगलप्लेस्टोअरवर जाऊन ई पीक पाहणी हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी.
  • पिक पेरणी ची माहिती सदरामध्ये तुमच्या जमिनीचा भूमापन क्रमांक /सनं/ गट क्रमांक निवडावा.
  • जेव्हा तुम्ही तुमच्या गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र  किती आहे व पोट खराब क्षेत्राबद्दल  सर्व माहिती दर्शवली जाईल.
  • हंगाम निवडा मध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्षापैकी हंगाम निवडू  शकतात.
  • पिक पेरणी साठी उपलब्ध क्षेत्र दर्शवली जाईल.
  • पिकांच्या वर्गामध्ये एक पिक पद्धती, मिश्र पीक,पॉलिहाऊस, शेडनेट हाऊस पिक,पडीत क्षेत्र  यापैकी योग्य पर्याय निवडावा.
  • जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पिकांची नोंद करण्यापूर्वी जमिनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम काय पड जमिनीची नोंदणी करावी.
  • पिकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्भिड पिकाचा प्रकार, फळ व फळपीक पर्याय दिसतील. यापैकी योग्य तो पर्याय निवडावा.
  • पीक पर्याय निवडून शेतातील पिकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंदणी करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळझाडांची संख्या व क्षेत्र नमूद करायला.
  • मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे. मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकानेव्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणात विभागून टाकावे. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूणक्षेत्रापेक्षा  जास्त होऊ नये.
  • चालू हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळीचालू पडक्षेत्र निवड करावे.
  • जल सिंचनाचे साधन पर्याय खाली पिकांना पाणी देण्यासाठी  ज्या सिंचन साधनांचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडावा.
  • त्यानंतर सिंचन पद्धत निवडायचे आहे.ठिबक सिंचन, तुषार सिंचन,प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे.
  • शेतकरी या ठिकाणी पिक पेरणी केलेला / लागवड केलेल्या पिकाचा दिनांक नमूद करतील ( साभार- कृषी नामा)
English Summary: online process of e pik pahaani on mobile app
Published on: 10 September 2021, 10:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)