Others News

उन्हाळ कांद्याच्या दरात गेल्या दोन महिन्यांत घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झालेले असतानाच बांगलादेशातील कांदा आयात उठविण्याचा निर्णय झाला आहे.

Updated on 02 July, 2022 9:55 PM IST

उन्हाळ कांद्याच्या दरात गेल्या दोन महिन्यांत घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झालेले असतानाच बांगलादेशातील कांदा आयात उठविण्याचा निर्णय झाला आहे. बांगलादेशमधील राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण विभागाचे महासंचालक ए. एच. एम. सफीक झमान यांनी परिपत्रक काढून कांद्यावरील आयात बंदी हटवली आहे. त्यामुळे बांगलादेशात भारतातून निर्यात सुरू होणार असल्याने येत्या काळात कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारचे कांदा निर्यातीबाबतचे धरसोड धोरण असल्याने अनेक परकीय बाजारपेठा गमावण्याची वेळ भारतावर आली आहे. 

मात्र आता बांगलादेश सरकारने गेल्या तीन महिन्यापासून घातलेली कांदा आयात बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या बांगलादेशातील श्यामबाजार ढाका, पभना, फरदापूर जिल्ह्यामध्ये किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे भाव प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये इतके भडकले आहेत. दहा दिवसांवर बकरी ईदचा सण आला आहे. त्यामुळे कांद्याची मागणी वाढली आहे.से आहेत भावलासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५५१, जास्तीत जास्त १८५१, सरासरी १३७५ रुपये प्रतिक्विंटल भाव होता. नाफेडकडून नाफेडने १४०० रुपये क्विंटल सरासरी भावाने कांदा खरेदी केला आहे.

बांगलादेशमधील राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण विभागाचे महासंचालक ए. एच. एम. सफीक झमान यांनी परिपत्रक काढून कांद्यावरील आयात बंदी हटवली आहे. त्यामुळे बांगलादेशात भारतातून निर्यात सुरू होणार असल्याने येत्या काळात कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारचे कांदा निर्यातीबाबतचे धरसोड धोरण असल्याने अनेक परकीय बाजारपेठा गमावण्याची वेळ भारतावर आली आहे. मात्र आता बांगलादेश सरकारने गेल्या तीन महिन्यापासून घातलेली कांदा आयात बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या बांगलादेशातील श्यामबाजार ढाका, पभना, फरदापूर जिल्ह्यामध्ये किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे भाव प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये इतके भडकले आहेत. दहा दिवसांवर बकरी ईदचा सण आला आहे. त्यामुळे कांद्याची मागणी वाढली आहे.असे आहेत भाव लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५५१, जास्तीत जास्त १८५१, सरासरी १३७५ रुपये प्रतिक्विंटल भाव होता. नाफेडकडून नाफेडने १४०० रुपये क्विंटल सरासरी भावाने कांदा खरेदी केला आहे.

English Summary: Onion exports to Bangladesh will start
Published on: 02 July 2022, 09:55 IST