Others News

मागील महिन्यात वन प्लस ने फ्लॅगशिप स्मार्टफोन वन प्लस 10T भारतासह जागतिक बाजारपेठेमध्ये लॉन्च केला. जर आपण या स्मार्टफोनचा विचार केला तर वनप्लस 10T हा ब्रँडचा सर्वात पावरफूल हँडसेट असून यामध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन आठ+Gen 1 प्रोसेसर मिळतो. एवढेच नाही तर यामध्ये 4800mAh बॅटरी देण्यात आली असून जी 150W सुपर वूक चार्जिंगला सपोर्ट देते.

Updated on 20 September, 2022 12:51 PM IST

मागील महिन्यात वन प्लस ने फ्लॅगशिप स्मार्टफोन वन प्लस 10T भारतासह जागतिक बाजारपेठेमध्ये लॉन्च केला. जर आपण या स्मार्टफोनचा विचार केला तर वनप्लस 10T हा ब्रँडचा सर्वात पावरफूल हँडसेट असून यामध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन आठ+Gen 1 प्रोसेसर मिळतो. एवढेच नाही तर  यामध्ये 4800mAh बॅटरी देण्यात आली असून जी 150W सुपर वूक चार्जिंगला सपोर्ट देते.

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून या फोनची सगळी रचना वन प्लस 10 प्रो सारखीच असून याचा स्टोरेज 16 जीबी पर्यंत रॅम आणी 256 जीबीपर्यंत स्टोरेज ऑफर करतो. या फोनचा चार्जिंग बद्दल कंपनीचे म्हणणे आहे की हा फोन एकोणवीस मिनिटात पूर्ण चार्ज होईल.

नक्की वाचा:Mobile News: उत्तम वैशिष्ट्य असलेला 'Vivo V 25' स्मार्टफोन दोन प्रकारात लॉन्च, वाचा या फोनची किंमत आणि वैशिष्ट्ये

 या फोनची किंमत

 वन प्लसचा हा फोन 49 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. ही किमत आठ जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरीयन्टची आहे. तसेच या फोनमध्ये बारा जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरीयन्ट असून याची किंमत 54 हजार 999 रुपये आहे.

त्यासोबतच यामध्ये टॉप व्हेरीयन्ट असून यामध्ये तुम्हाला सोळा जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असून त्याची किंमत 55 हजार 999 रुपये आहे. हा हँडसेट जेड ग्रीन आणि मून स्टोन ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे.

नक्की वाचा:अरे वा! एक लाखाचा लॅपटॉप मिळणार 40 हजार पेक्षा कमी किमतीत, भारताचे सेमीकंडक्टर करणार कमाल

 यामध्ये 6.7 इंच फुल एचडी + रिझोल्युशन असलेले LTPO2 10- बीट अमोलेड डिस्प्ले आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून त्याची मुख्य लेंस 50 मेगापिक्सल आहे. यामध्ये 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि दोन मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा मिळतो.

तसेच फ्रंटला कंपनीने 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये कनेक्टिव्हिटी साठी 5G,4G LTE, वाय-फाय सहा, जीपीएस/A-GPS, NFC आणि यूएसबी टाइप सी पोर्ट समाविष्ट आहे. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि  फेस अनलॉक फिचर देखील आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी किसान विकास पत्र योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; गुंतवणूकदारांचे पैसे होतात दुप्पट

English Summary: oneplus 10t smarphone is so featurable and affordable price for customer
Published on: 20 September 2022, 12:51 IST