Others News

सध्या मोठ्या प्रमाणात स्मार्ट टीव्ही ची मागणी वाढली आहे. खेड्यापाड्यापासून ते अगदी शहरी भागापर्यंत सर्वत्र आता जुना डब्बा टीव्ही जणू काही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आता सर्वत्र स्मार्ट टीव्ही वापरला जाऊ लागला आहे. मित्रांनो जर आपणही आपला टीव्ही बदलू इच्छित असाल तर आपल्यासाठी आजची ही बातमी खास आहे. कारण की आज आम्ही आपणास अशा एका भन्नाट ऑफरविषयी अवगत करणार आहोत ज्याअन्वये तुम्ही स्मार्ट टीव्ही केवळ साडेसात हजार रुपयात खरेदी करू शकता.

Updated on 17 April, 2022 8:05 PM IST

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सध्या फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग साइटवर टीव्ही डे सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये शानदार एलइडी स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे जर आपणास स्मार्ट टीव्ही खरेदी करायची असेल तर ही ऑफर दवडू नका लवकरात लवकर ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर भेट द्या आणि आपल्या आवडीची एलइडी स्मार्ट टीव्ही घरी घेऊन जा. मित्रांनो फ्लिपकार्टचा हा सेल केवळ एकोणवीस तारखे पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे आपणास जर टीव्ही खरेदी करायचा असेल तर त्वरा करावी लागणार आहे.

कोडक 60 सेमी. स्मार्ट टीव्ही [KODAK 60 cm (24 inch) HD Ready LED TV(24HDX100S)]:- KODAK 24 inch HD Ready LED TV हा एक स्मार्ट टीव्ही आहे. या टीव्हीची मूळ किंमत 10,499 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र आपणास ही टीव्ही खरेदी करण्यासाठी एवढे पैसे खर्च करावे लागणार नाहीत कारण की फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये हा टीव्ही फक्त 7,499 रुपयेमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय, फ्लिपकार्टने अजुन एक भन्नाट ऑफर या टीव्हीसाठी सुरू केली आहे. 

मित्रांनो जर आपण या टीव्हीला खरेदी करण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर आपणांस 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक देखील फ्लिपकार्ड कडून दिले जाणार आहे. या टीव्हीला 24 इंचचा शानदार डिस्प्ले देण्यात आला आहे. यामुळे निश्चितच या बजेटमध्ये चांगली स्क्रीन साइज आपणास उपलब्ध होणार आहे. या टीव्हीचे रिझॉल्यूशन 1366×768 पिक्सल एवढे दमदार आहे. तसेच या टीव्हीचा रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज एवढा आहे. KODAK चा हा टीव्ही 20 वॉट स्पीकरसह येतो, यामुळे या बजेटमध्ये याची साऊंड कॉलिटी देखील चांगली राहणार आहे.

English Summary: Oh wow LED TVs are available at this place, but at seven and a half thousand; Buy early; Offer for a limited period
Published on: 17 April 2022, 08:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)