Others News

गेल्या वर्षी पासून कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लाखो लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा बिकट परिस्थितीत बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या कोणकोणत्या व्यवसायिक कर्ज योजना आहेत त्याबद्दल या लेखात माहिती घेणार आहोत. या व्यवसायिक कर्ज योजनांच्या मदतीने बेरोजगार तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होऊ शकतात.

Updated on 24 June, 2021 1:55 PM IST

 गेल्या वर्षी पासून कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लाखो लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा बिकट परिस्थितीत बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या कोणकोणत्या व्यवसायिक कर्ज  योजना आहेत त्याबद्दल या लेखात माहिती घेणार आहोत. या व्यवसायिक  कर्ज योजनांच्या मदतीने बेरोजगार तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होऊ शकतात.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग

 योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये राबविली जाणार आहे. या युवकांना व्यवसाय करायचा आहे असे तरुण या योजनेच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय करण्याचा प्रकल्पासाठी जे कर्ज काढावे लागणार आहे, प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान या योजनेच्या माध्यमातून तरुणांना दिले जाते शिवाय या योजनेच्या माध्यमातून तरुणांना शासकीय अनुदान मिळत असल्यामुळे व्यवसाय कर्ज भरण्यास सोपे जाईल.

 एक जिल्हा एक उत्पादन योजना

 एक जिल्हा एक उत्पादन योजना या सूत्रा वर ही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना राबवली जाणार आहे. या योजनेच्या मदतीने सुशिक्षित बेरोजगार युवक त्यांचा व्यवसाय उभारू शकतात.

या योजनेच्या माध्यमातून बँकेकडून मिळालेल्या कर्ज वर पस्तीस टक्के सबसिडी किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये अनुदान मिळते या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 27 कोटी 57 लाख 78 हजार रुपयांच्या निधी मिळाल्याचा  प्रशासकीय मान्यता मिळाल्याचा  जीआर 15 जून 2021 ला आला आहे.

 या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या पिकांचे जास्त उत्पादन घेतले जाते या पिकांच्या संदर्भातील उद्योग उभारण्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. फळबागा असलेल्या जिल्ह्यांमध्ये फळांवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाईल.

 या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

MOFPI या संकेत स्थळावर जाऊन व्यवसाय उभारणी इच्छुक तरुणांनी किंवा शेतकऱ्यांनी व्यवसायिक कर्जासाठी त्यावर मिळणाऱ्या अनुदानासाठी रजिस्ट्रेशन करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवणे आवश्यक आहे. वर  उल्लेख केलेल्या वेबसाईटवर जाऊन एम बी रजिस्ट्रेशन करू शकता. MOFPI या वेबसाईटवर जाऊन नोंदणी केल्यानंतर नोंदणी लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवा. योजना आणि प्रकल्प संदर्भातील माहिती व्यवस्थित वाचून घेऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करताना तुमच्या तालुक्यातील आत्मा अधिकारी यांचीदेखील तुम्ही मदत घेऊ शकता. जर तुम्हाला हा अर्ज परिपूर्ण सादर करता आला नाही तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हा पातळीवरील एक किंवा अनेक तज्ज्ञांची नियुक्ती केलेली असते.  या तज्ञांचे  काम असते की, ज्या कोणा तरुणांना अर्ज करण्यास अडचण येईल त्यांना संपूर्ण मदत करणे एवढेच नाही तर प्रकल्प साठी प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, उद्योग आधार कसे काढावे ही व इतर संपूर्ण मदत या नियुक्त  तज्ञांकडून केली जाते.

English Summary: occupattion loan scheme
Published on: 24 June 2021, 01:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)