भारतात आधार एक ऑल इन वन दस्ताऐवज बनले आहे. भारतात आधार कार्ड (Aadhar Card) हे एक प्रमुख ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा आहे तसेच आधार कार्ड हे केवायसी साठी महत्वाचे दस्ताऐवज आहे. आधार कार्ड हे जवळपास प्रत्येक महत्वाच्या कामात गरजेचे आहे, मग ते गॅस कनेक्शन घेणे असो, बँकेत खाते खोलने असो, किंवा तहसील मध्ये काही कागदपत्रे काढणे असो. प्रत्येक सरकारी तसेच गैर सरकारी महत्वाच्या कामात आधार कार्डची आवश्यकता भासते. पण तुम्हाला माहित आहे का जर आधार कार्डला आपला मोबाईल नंबर नोंदणी केलेला नसेल तर आपल्याला अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागू शकते.
त्यामुळे आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक करणे गरजेचेच आहे. जर आपणही आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल अथवा आपला मोबाईल हरवला असेल त्यामुळे मोबाईल क्रमांक बदलला असेल, अथवा अन्य काही कारणांनी मोबाईल क्रमांक बदलला असेल आणि अजून मोबाईल क्रमांक आधार कार्ड सोबत लिंक केलेला नसेल तर ताबडतोब आपला मोबाईल क्रमांक आधार सोबत लिंक करून घ्या. आता आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक करणे सोपे झाले आहे. मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक दोन पद्धत्तीने करतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ह्याव्यतिरिक्त आपण पोस्टमॅनद्वारे देखील आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
ह्याविषयींची माहिती इंडियन पोस्टने ट्विट करून दिली आहे.
भारतीय टपाल खात्याने (Indian Postal Department) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करून सांगितले की, स्थानिक पोस्टमन/ग्रामीण डाक सेवक ह्यांच्या मार्फत आपण आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी अपडेट करा. ह्यासाठी सेवा शुल्क लागू असेल.
मोबाईल नंबर (Mobile Number) आधार कार्डशी लिंक असणे महत्वाचे आहे. आधार कार्डला आपला मोबाईल क्रमांक जोडलेला असला तर आपण, आधार कार्ड मध्ये ऑनलाईन नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता बदलू शकतो.
ह्याव्यतिरिक्त अनेक अशा सरकारी योजना असतात जिथे आपल्या आधारकार्डशी मोबाईल नंबर लिंक असने गरजेचे असते. त्यामुळे जर आपणही आपल्या आधार कार्डवर मोबाईल नंबर अपडेट केलेला नसेल तर लवकरात लवकर करुन घ्या आणि शासनाच्या कल्याणकारी योजनाचा फायदा घ्या.
Published on: 21 October 2021, 02:57 IST