Others News

भारतात आधार एक महत्वाचे डॉक्युमेंट म्हणून ओळखले जाते. अलीकडे भारतात आधार कार्ड शिवाय दुसरा काही पर्याय राहिलेला नाही. आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेले आहे. भारतात सिम कार्ड घेण्यापासून ते महत्वाच्या सरकारी कामापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे

Updated on 21 November, 2021 8:35 PM IST

भारतात आधार एक महत्वाचे डॉक्युमेंट म्हणून ओळखले जाते. अलीकडे भारतात आधार कार्ड शिवाय दुसरा काही पर्याय राहिलेला नाही. आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेले आहे. भारतात सिम कार्ड घेण्यापासून ते महत्वाच्या सरकारी कामापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे

शाळेत तसेच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी, बँकेत खातं खोलण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, पॅन कार्ड काढण्यासाठी इत्यादी ठिकाणी आधार कार्ड उपयोगी पडते. एवढेच नाही तर अलीकडे फक्त आधारकार्ड वर लोन देखील मिळू शकते. जर आपल्याला इमेरजेन्सी पैशांची गरज पडली तर आपण केवळ आधार कार्ड व पॅन कार्ड द्वारे पर्सनल लोन देखील प्राप्त करू शकता. आज कृषी जागरण आपल्या वाचक मित्रांसाठी काही अशा स्टेप्सविषयी माहिती देणार आहे ज्या फॉल्लो करून आपण सहज पर्सनल लोनसाठी अँप्लाय करू शकता, आणि केवळ आधार कार्डचा उपयोग करून पर्सनल लोन प्राप्त करू शकता.

आधार कार्डच्या मदतीने आपण सहज पर्सनल लोन मिळवू शकता. एवढेच नाही बँक आपल्याकडून कुठलेच कॉलटरल अथवा security मागत नाही, फक्त आधार आणि पॅन कार्डवर बँक आपल्याला पर्सनल लोन देते. चला तर मग जाणुन घेऊया याविषयी सविस्तर

ह्या पद्धतीने केवळ आधार कार्डमुळे मिळेल पर्सनल लोन

जर आपल्याला बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर आपल्याला काही कागदपत्रांची गरज पडेल, जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड.

ह्या कागदपत्रांची मदतीने आपण आपली kyc पूर्ण करू शकता. KYC पूर्ण झाली की आपल्याला लोन सहज मिळू शकते. आपल्याकडे ओळखीचा पुरावा तसेच रहिवासी पुरावा मागितला जाईल आपण यासाठी देखील आधार वापरू शकता. पर्सनल लोन घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.

 पर्सनल लोनसाठी ह्या प्रकारे करा अँप्लाय

»जर आपल्याला पर्सनल लोन घ्यायचे असेल तर सर्व्यात आधी ज्या बँकेचे लोन घ्यायचे आहे त्या बँकेचे ऑफिसिअल अँप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.

»आपण बँकेचे अँप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता.

 

»अँप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्या अँप्लिकेशन मध्ये जाऊन लॉगिन करावे लागेल.

»लॉगिन झाल्यानंन्तर आपल्याला तिथे पर्सनल लोनचा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

»आपण अँप्लिकेशन वर पर्सनल लोनसाठी पात्र आहात की नाही हे चेक करू शकता.

»यानंतर तुम्हाला आपला वैयक्तिक तपशील, व्यवसाय आणि नोकरीबद्दल माहिती द्यावी लागेल.

»त्यानंतर आपले वेरिफिकेशन केले जाईल

»आधार कार्डची प्रत अपलोड करावी लागेल, आधार कार्ड अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल

»यानंतर कर्जाचे पैसे सरळ खात्यात ट्रान्सफर केले जातील.

English Summary: now you can get personel loan by your adhaar card
Published on: 21 November 2021, 08:35 IST