Others News

भारतात आधार कार्ड जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे पॅन कार्ड. पॅन कार्ड एक महत्वाचे दस्ताऐवज आहे पॅन कार्ड नसल्याने अनेक कामे ही अर्धवटच राहून जातात. बँकिंग क्षेत्रात पॅन कार्ड खुप महत्वाचे ठरते केवायसी साठी देखील पॅन कार्डची गरज भासते. असे असले तरी अजून कित्येक व्यक्तींनी आपले पॅन कार्ड बनवले नाहीय. आणि त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते

Updated on 20 October, 2021 7:11 PM IST

भारतात आधार कार्ड जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे पॅन कार्ड. पॅन कार्ड एक महत्वाचे दस्ताऐवज आहे पॅन कार्ड नसल्याने अनेक कामे ही अर्धवटच राहून जातात. बँकिंग क्षेत्रात पॅन कार्ड खुप महत्वाचे ठरते केवायसी साठी देखील पॅन कार्डची गरज भासते. असे असले तरी अजून कित्येक व्यक्तींनी आपले पॅन कार्ड बनवले नाहीय. आणि त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते

पॅन कार्ड हे बँकेत खाते खोलण्यासाठी, डीमॅट अकाउंट खोलण्यासाठी, डेबिट कार्ड बनवण्यासाठी, क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी आवश्यक दस्ताऐवज आहे. पण हे महत्वाचे दस्ताऐवज अनेक लोक बनवायला उशीर होतो म्हणुन बनवु शकले नाहीत. आधी पॅन कार्ड बनवण्यासाठी खुप वेळ लागत असे आणि सायबर कॅफे वर जाऊन कागदपत्रे जमा करावी लागत व त्यानंतर 21 दिवसांनी पॅन कार्ड बनत असे; पण आता गये वो दिन! आता पॅन कार्ड केवळ 10 मिनिटात तयार होणार आहे. आणि त्यासाठी कशी काय प्रोसेस आहे ते आज आपण जाणुन घेणार आहोत.

 कसं काय बनवणार पॅन कार्ड

मित्रांनो जर आपल्याकडेही पॅन कार्ड नसेल आणि आपल्याला त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे तर चिंता करू नका आता पॅन कार्ड अवघ्या काही मिनिटात बनवता येणार आहे.

अहो खरंच! कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण आम्ही खरं सांगतोय आता पॅन कार्ड केवळ काही मिनिटात बनवता येणार आहे. भारत सरकारच्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटने इ-फायलिंग पोर्टल वर नागरिकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे केवळ आधार कार्ड च्या आधारावर आता पॅन कार्ड बनवता येणार आहे. पण त्यासाठी काही नियम व शर्ती लावण्यात आल्या आहेत.

नियम व शर्ती

»जो व्यक्ती पॅन कार्डसाठी अँप्लाय करणार आहे त्याच्याकडे ह्याआधी कधीच पॅन कार्ड नसावे. म्हणजे तो पॅन कार्ड धारक नसावा.

»त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक हा आधार कार्ड समवेत लिंक केलेला असावा.

»त्या व्यक्तीची संपूर्ण जन्मतारीख ही आपल्या आधार कार्ड वर नमूद असावी.

»तसेच त्यांचे वय हे पॅन कार्ड प्राप्त करण्यासाठी योग्य असावे.

 पॅन कार्ड बनवण्याची प्रोसेस

ताबडतोब पॅन कार्ड बनवण्यासाठी https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/instant-e-pan ह्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

 

होमपेजवर तुम्हाला इन्स्टंट इ-पॅन ह्या पर्यायावर क्लिक करा

त्यांनतर गेट न्यू इ-पॅन ह्या ऑपशनवर क्लिक करा

आपला आधार क्रमांक विचारलेल्या ठिकाणी प्रविष्ट करा.

त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या म्हणजेच नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करा.

आधार डिटेल्स व्हेरिफाय करा तसेच ई-मेल आयडी व्हेरिफाय करा आणि आपले इ-पॅन डाउनलोड करा.

 सौर्स news24

English Summary: now you can get pan card by online process
Published on: 20 October 2021, 07:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)