Others News

सध्या मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे परवडण्याजोग्या किमतीमध्ये चांगले स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत. त्यामुळे प्रत्येकाला स्मार्टफोन वापरणे शक्य होत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने 'रियलमी C33' हा स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. हा फोन तीन कलरमध्ये उपलब्ध असून अतिशय परवडण्याजोग्या किमतीमध्ये ग्राहकांना हा मोबाईल घेता येणार आहे.

Updated on 07 September, 2022 1:57 PM IST

सध्या मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे परवडण्याजोग्या किमतीमध्ये चांगले स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत. त्यामुळे प्रत्येकाला स्मार्टफोन वापरणे शक्य होत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने 'रियलमी C33' हा स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. हा फोन तीन कलरमध्ये उपलब्ध असून अतिशय परवडण्याजोग्या किमतीमध्ये ग्राहकांना हा मोबाईल घेता येणार आहे.

नक्की वाचा:Important: जीवन विमा पॉलिसीवर कसे मिळते कर्ज? वाचा या संबंधी महत्वाची माहिती

 या फोनची वैशिष्ट्ये

 जर आपण या स्मार्टफोनचे वैशिष्ट्यांचा विचार केला तर या मध्ये 50 मेगापिक्सल अधिक 0.3 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. जर तुम्हाला हा स्मार्ट फोन घ्यायचा असेल तर तुम्हाला 12 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीने खरेदी करता येणार आहे.

या मोबाईलमध्ये  किमतीनुसार थोडाफार बदल करण्यात आला आहे. म्हणजेच या मोबाईलची एकूण किंमत ही 10,000 पेक्षा कमी आहे. समजा तुम्ही 8999 रुपयांमध्ये मोबाईल घेतला तर यामध्ये तीन जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

अशातच तुम्ही जर ₹9999 मध्ये मोबाईल घेतला तर यामध्ये चार जीबी रॅम 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. परंतु यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या दोन्ही प्रकारांमध्ये फक्त जे काही स्टोरेज आहे यामध्ये बदल करण्यात आलेला आहे बाकीचा कुठलाही बदल या मध्ये दिसणार नाही.

नक्की वाचा:Mobile Update: खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतो सॅमसंग A04 स्मार्टफोन, वाचा या फोनची किंमत आणि वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh लिथियम आयन बॅटरी असून 10W चार्जिंग आहे. या मोबाईलचा डिस्प्लेचा विचार केला तर तो साडे सहा इंचाचा HD+ डिस्प्ले आहे.

यामध्ये जे काही इंटरनल स्टोरेज आहे ते तुम्ही 1 टीबी पर्यंत वाढवू शकतात. या स्मार्टफोनच्या बाजूला माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर दिले गेले आहे. हा मोबाईल 187 ग्रॅम वजनाचा असून 10W चार्जरने चार्ज करण्यास सक्षम आहे.

हा स्मार्टफोन नाईट सी, सेंडी गोल्ड आणि एक्वा ब्लू या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या मोबाईलच्या तळाशी फायरिंग स्पीकर आणि मायक्रो यूएसबी पोर्ट असेल.

या मोबाईलची एक वर्षाचे वारंटी मिळेल व त्यासोबतच वापरकर्त्याला बॉक्समध्ये अडप्टर, यूएसबी केबल, वॉरंटी कार्ड तसेच सिम कार्ड टूल देखील मिळेल. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिमसाठी हायब्रिड सिम स्लॉट देण्यात आला आहे.

नक्की वाचा:Gold Price Update: सोने 5600 रुपयांनी स्वस्त! 10 ग्रॅम सोने 30 हजारांपेक्षा कमी भावाने खरेदी करा...

English Summary: now you can buy realmi c33 smartphone in so affordable price
Published on: 07 September 2022, 01:57 IST