भारतात मतदान करण्यासाठी मतदान कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वापरण्यात येते, मतदान करणे हे प्रत्येक भारतीयाचे एक कर्तव्य आहे तसेच हा एक अधिकार देखील आहे. भारतात मतदान प्रक्रिया ही पूर्णतः स्वावलंबी आहे, मतदान प्रक्रियेवर न्यायव्यवस्थेचा तसेच संसदीय कार्य व्यवस्थेचा कुठलाही दबाव नाही. असे असले तरी भारतात मतदान प्रक्रियेत धांधली मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने यावर अंकुश लावण्यासाठी मतदान कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी अनुमती दिली आहे.
मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात होत असलेल्या बोगस मतदानावर निर्बंध घातले जावे हे आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की अद्याप तरी मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य केले गेलेले नाही. हे पूर्णता व्यक्तीच्या विवेक बुद्धीवर अवलंबून असणार आहे, सरकार मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी नागरिकांना बळजबरी करणार नाहीय. यासंबंधीची अधिक माहिती अशी आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची अनुमती नुकतीच दिली आहे.
जाणून घ्या कसे करणार मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक
मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी सर्वप्रथम आपणांस https://voteportal.eci.gov.in या भारत सरकारच्या ऑफिशियल इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर आपणास मोबाईल नंबर अथवा वोटर आयडी नंबर अथवा इमेल द्वारे लॉगिन घ्यावे लागेल. या नंतर आपण ज्या राज्यात राहता त्या राज्याची माहिती जिल्हा व आपली पर्सनल माहिती भरावी लागणार आहे. सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरल्यानंतर आपणास सर्च नावाचा ऑप्शन दिसत असेल त्यावर क्लिक करावे लागणार आहे.आपण दिलेली माहिती जर यथायोग्य असेल तर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. आता या नवीन पेजवर ती आपणास फीड आधार नंबर यावर क्लिक करावं लागेल. इथे आपला बारा अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल सोबतच आपणास आपली वैयक्तिक माहिती देखील भरावी लागणार आहे. सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरल्यानंतर माहिती पुनश्च एकदा तपासून घ्या आणि नंतर सबमिट बटन वर क्लिक करा. एवढे झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवर रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या झाल्याचा मेसेज दिसेल.
SMS पाठवून देखील करता येणार लिंकिंग- आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना लिंक करायचे असेल तर आपण ते एसएमएसद्वारे देखील करू शकता यासाठी आपणांस 166 किंवा 51969 वर मतदान कार्डचा नंबर आणि आधार कार्ड नंबर पाठवावा लागेल.
कॉल करून देखील करता येणार लिंकिंग- जर आपणास मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायचे असेल तर आपण केवळ एका कॉल द्वारे ते करू शकता यासाठी आपणास 1950 या नंबर वर फोन करावा लागेल, मित्रांनो लक्षात ठेवा सोमवार ते शुक्रवार या दरम्यानच आपण फोन करू शकता.
Published on: 17 December 2021, 04:45 IST