Others News

भारतात आधार कार्ड एक महत्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आधार कार्डशिवाय भारतात एक साधं सिम कार्ड सुद्धा काढता येऊ शकत नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट अपडेटेड ठेवणे महत्त्वाचे ठरते, अनेक व्यक्तींच्या आधार कार्डवर अजूनही मोबाईल नंबर अपडेट केलेला नाहीय. पण आता या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे.आता आधार कार्ड वर मोबाईल नंबर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन देखील अपडेट करता येणार आहे. यामुळे नक्कीच नागरिकांचा फायदा होणार आहे असे सांगितले जात आहे.

Updated on 18 December, 2021 10:39 PM IST

भारतीय डाक विभाग व भारतीय पोस्टल पेमेंट्स बँक यांच्याद्वारे चालविली जाणाऱ्या या सेवेमुळे आधार कार्ड वरती मोबाईल नंबर अपडेट करणे अजूनच सोपे होणार आहे. आता कुठलाही व्यक्ती आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपल्या आधार कार्ड वरती मोबाईल नंबर अपडेट करू शकतो. आधार कार्ड वरती मोबाईल नंबर हा पोस्टमॅन द्वारे घरबसल्या देखील अपडेट करता येऊ शकतो.

यासाठी आधारची संस्था युआयडीएआय यांनी इंडिया पोस्ट सोबत एक विशिष्ट करार केला आहे. ज्याद्वारे युआयडीएआय मोबाईल अपडेट सर्विस ला पोस्ट ऑफिसद्वारे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन कोणीही सहजरीत्या मोबाईल नंबर अपडेट करू शकतो. या सेवेमुळे डोंगराळ भागात तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या व्यक्तींना विशेष फायदा मिळणार असे सांगितले जात आहे.

आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट का करावा लागतो

भारतात अलीकडे अनेक प्रकारच्या कागदपत्रांची ऑनलाइन नोंदणी करताना तसेच अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना आधार कार्ड पडताळणी करावी लागते यासाठी आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य असते. कारण की फॉर्म भरताना किंवा आधार पडताळणी करताना रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठविला जातो ज्याद्वारे ही पडताळणी पूर्ण होते म्हणून आधार कार्ड वर मोबाईल क्रमांक अपडेट असणे खुपच महत्वाचे असते. आधार कार्ड हे सिमकार्ड घेणे, बँक खाते उघडणे, आयकर रिटर्न भरणे, डिजिटल आयुष्मान आरोग्य कार्ड नोंदणी करणे, किसान सन्मान निधी नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, विविध स्पर्धा परीक्षा आणि इतर ऑनलाइन फॉर्म भरताना, आधार अत्यावश्यक असते शिवाय आधार कार्डला मोबाईल क्रमांक नोंदणी असणे देखील अत्यावश्यक असते. मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवूनच पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाते.

English Summary: now in post office mobile number on aadhar card will be updated
Published on: 18 December 2021, 10:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)