होमगार्ड म्हटले म्हणजे प्रत्येक बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणारे जवान होय. परंतु जर आपण पोलिसांच्या तुलनेत होमगार्ड कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांना हव्या तेवढ्या सरकारी सुविधा अजून पर्यंत दिल्या जात नाहीत. परंतु आता होमगार्ड कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून होमगार्ड सुरक्षारक्षकां साठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता होमगार्ड कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
काय आहे सविस्तर माहिती?
महाराष्ट्र होमगार्ड मध्ये संलग्न असलेल्या जवळजवळ पन्नास हजार जवानांना मृत्यू झाल्यास 50 लाख रुपयांचा विमा संरक्षण दिले जाणार असून त्यासोबतच गंभीर जखमी साठी 20 लाख रुपयांचे सुरक्षाकवच देखील याद्वारे मिळणार आहे.
तसेच अन्य खासगी बँकेत कर्मचाऱ्यांसाठी खाते उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर होमगार्ड कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण आता वाढवण्यात आले आहे. एवढेच नाही तर पुर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पगार थेट जमा होत असे. परंतु ही खाती एकाच बँकेत नसल्यामुळे बँकांकडून काही फायदा मिळण्याची संधी होमगार्ड सुरक्षारक्षकांना नव्हती परंतु ती आता मिळणार आहे.
होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या आहेत 'या' मागण्या
राज्यभरातील होमगार्ड यांनी मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आक्रमक झाले होते. सहा ऑगस्टला पुण्यात ठिय्या आंदोलन करून विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये जाचक अटी लावून काही कारणांनी अपात्र होमगार्ड यांना त्वरित विनाअट कामावर रुजू करून घ्यावे तसेच होमगार्ड कर्मचाऱ्यांना वर्षाचे 365 दिवस कामावर घ्यावे इत्यादी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.त्या
सोबतच बंदोबस्त मानधन आठवड्याभरात द्यावे व महत्त्वाचे म्हणजे पोलीस खात्यातील पाच टक्के आरक्षण हे 15 टक्क्यांपर्यंत करावे. तसेच तीन वर्षांनी होणारी पुनर नोंदणी व नियुक्तीची पद्धत बंद करण्यात यावी. या व इतर मागण्या यावेळी होमगार्ड यांच्याकडून करण्यात आल्या होत्या.
नक्की वाचा:News: खरिपातील नुकसान भरपाईबाबत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की…
Published on: 22 August 2022, 01:14 IST