एसबीआयने आत्ता लहान मुलांसाठी देखील बँक अकाउंट खोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, यामुळे कोवळ्या वयातच मुलांना पैशांची बचत करण्याची सवय लागेल असे सांगितले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे या बँकेणेच पहिली उडान योजना अमलात आणली आहे या योजनेअंतर्गत पालक आपल्या लहान मुलांचे अर्थात 18 वर्षाखालील मुलांचे बँक खाते बोलू शकता.
या लहान मुलांच्या बँक खात्यात जमा केलेल्या पैशांवर बँक रोजाना व्याज देखील जमा करणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेअंतर्गत त्या मुलांचे बँक अकाउंट खोले जाणार आहे ज्या मुलांचे वय दहा वर्षापेक्षा अधिक आणि 18 वर्षांपेक्षा कमी आहे. हे एक सिंगल बँक खाते असणार आहे. या योजनेअंतर्गत बँक खाते खोलण्यासाठी मुलाचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे तसेच मुलांच्या पालकांची केवायसी झालेली असणे बंधनकारक असणार आहे.
एसबीआयच्या उडान योजनेअंतर्गत खोललेले खाते देशातील कोणत्याही ब्रांच मध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते. ट्रान्सफर करताना या बँक खातेचा खाते क्रमांक बदलला जाणार नाही. या अकाऊंटला वारस लावण्याची देखील सुविधा बँकेकडून देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, खातेधारकांना पासबुक देखील देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर चेकबुक देखील या खातेधारकांना देण्यात येणार आहे, मात्र हे चेक बुक त्यांच्या पालकांना दिले जाणार आहे. यामुळे कोवळ्या वयातच मुलांना बँकिंग व्यवहार समजण्यास मदत होईल अशी आशा आहे.
SBI उडान अंतर्गत बचत बँक खात्यातील व्याजदराची गणना दररोजच्या शिल्लक रकमेच्या आधारावर केली जाते. हे खाते उघडल्यानंतर मुलाच्या नावाने एक विशेष प्रकारचे एटीएम कार्डही जारी केले जाते. या एटीएम कार्डवर मुलाचा फोटो देखील दिला जातो. या एटीएम कार्डची मर्यादा 5 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, IMPS द्वारे दैनंदिन व्यवहाराची मर्यादा 2,000 रुपये आहे. याशिवाय इंटरनेट बँकिंग सुविधाही उपलब्ध आहे. एकंदरीत यामुळे लहान मुलांना बँकिंग व्यवहार समजण्यास मदत होणार आहे.
Published on: 06 March 2022, 12:32 IST