Others News

बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असून या बँकेने एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून बँक ग्राहकांसाठी एनपीएस खाते अर्थात पेन्शन खाते उघडण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ करेल. बँक ऑफ इंडियाने पेन्शन फंड रेगुलेटर च्या सहकार्याने एक डिजिटल प्लेट फार्म सुरू केला असून त्या माध्यमातून तुमचा मोबाईल फोन वापरून तुम्हाला एनपीएस खाते उघडता येईल.

Updated on 19 July, 2022 3:18 PM IST

 बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असून या बँकेने एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून बँक ग्राहकांसाठी एनपीएस खाते अर्थात पेन्शन खाते उघडण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ करेल. बँक ऑफ इंडियाने पेन्शन फंड रेगुलेटर च्या सहकार्याने एक डिजिटल प्लेट फार्म सुरू केला असून त्या माध्यमातून तुमचा मोबाईल फोन वापरून तुम्हाला एनपीएस खाते उघडता येईल.

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आणि बँक ऑफ इंडियाने K-Fintech सोबत भागीदारीत एनपीएस नोंदणीसाठी हे डिजिटल प्लेट फार्म सुरू केले आहे.

नक्की वाचा:मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ

 पेन्शनरांचे स्वप्न होणार साकार

 या डिजिटल प्लेटफॉर्मचे उद्घाटन करताना पेन्शन फंड रेग्युलेटरी ॲन्ड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय यांनी म्हटले की,

आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की बँक ऑफ इंडिया ने  K-Fintechच्या सहकार्याने नवीन एनपीएस नोंदणीसाठी डिजिटल मोड लॉन्च केला आहे.मला खात्री आहे की बँकेच्या या उपक्रमामुळे पेन्शनर लोकांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.

नक्की वाचा:EPF Investment: पीएफचे पैसे तुम्हाला करोडपती बनवतील; कसे ते पहा...

याबाबतीत पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आणि बँक ऑफ इंडिया सांगितले की, कर्जदारांच्या ग्राहक आता क्यूआर कोड स्कॅन करून त्यांची एनपीएस खाते उघडू शकतील. ग्राहक आता कोणत्याही अडचणी शिवाय एनपीए खाते उघडू शकतात जे फक्त क्यूआर कोड स्कॅन करून पेपरलेस प्रक्रियेद्वारे केले जाईल. क्यूआर कोड स्कॅन केल्याने एनपीएस खाते उघडणारे वेब पेज उघडेल.

ज्यामध्ये अर्जदाराला त्याचा मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि ओटीपी वापरून नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल. यानंतर अर्जदाराला आधार क्रमांक टाकण्यापासून ते चित्र आणि डिजिलॉकर कॅप्चर करण्यापर्यंतचे सगळे तपशील व्यवस्थित भरावे लागतील. सगळे तपशील व्यवस्थित भरल्यानंतर एनपीएस खाते ओपन केले जाईल.

नक्की वाचा:अरे वा!अविश्वसनीय आणि खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतो 'हा' उत्तम दर्जाचा स्मार्टफोन, वाचा वैशिष्ट्ये

English Summary: now can open nps account to scan qr code that service provide by bank of india
Published on: 19 July 2022, 03:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)