Others News

वॉलमार्टच्या मालकीची डिजिटल पेमेंट कंपनी फोन पेने सोन्यात गुंतवणूक करता यावी यासाठी युपीआय एसआयपी लॉन्च केली आहे.

Updated on 26 May, 2022 3:55 PM IST

वॉलमार्टच्या मालकीची डिजिटल पेमेंट कंपनी फोन पेने सोन्यात गुंतवणूक करता यावी यासाठी युपीआय एसआयपी लॉन्च केली आहे.

. एसआयपी म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना होय. फोन पे वापरणारे आत्ता 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवू शकतात. बिझनेस स्टॅंडर्ड मधील एका अहवालानुसार, हे सोने फोन पे चे भागीदार एम एम टी सी - पी ए एम पी आणि सेफ गोल्ड द्वारे राखलेल्या विमा उतरवलेल्या बँक ग्रेड लॉकर्स मध्ये जमा केलेजाईल.

फोन पे वर गोल्ड एसआयपी सुरु करण्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे त्यात उपलब्ध यूपीआयची सुविधा ही होय.यामध्ये फोन पे वापरणाऱ्या फक्त सोन्याचा प्रदाता निवडावा लागेल.त्यानंतर मासिक गुंतवणूक करावयाचीरक्कम नमूद करावी लागेल आणि यूपीआय पिनसह त्याची पुष्टी करावे लागेल. गोल्ड एसआयपी सुरू करणेही अगोदर खूप त्रास युद्ध प्रक्रिया होती आता तीत्रास न होणारी आणि अगदी सहजपणे होणारी प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतरची सर्व गुंतवणूक  स्वयंचलित असेल.तसेच वापरकर्त्याचे त्याच्या सोन्याच्या गुंतवणुकीवर पूर्ण नियंत्रण असेल.

जे तुम्ही तुमच्या सोने तुम्हाला हवे तेव्हा विकू शकता आणि ते पैसे तुमच्या बँक खात्यात मिळवू शकतात.तसेच तुम्ही सोने,सोन्याची नाणीच्या रूपात उचलणे देखील निवडू शकता. तुमच्या अगदी घरापर्यंत पोहोचवण्यातजातील.

 अगदी शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता

 याबाबत फोन पे ने सांगितले कि गोल्ड एसआयपी वापरकर्त्याला 24 कॅरेट सोन्यामध्ये दरमहा किमान शंभर रुपयांच्या गुंतवणुकीसह गुंतवणूक करण्यास आणि त्यांच्या सोन्याची बचत पद्धतशीरपणे वाढवण्यासाठी नियमितपणे लहान रकमेसह गुंतवणूक करणे सुरू ठेवण्याची परवानगी देते.

ही गुंतवणूक नियतकालिक असल्याने वापरकर्त्याला त्याच्या गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी  सोन्याच्या किमतीवर लक्ष ठेवण्याचे कुठल्याही प्रकारची गरज नाही. तसेच ठराविक रक्कम सोन्यात नियमित अंतराने गुंतवल्याने वापरकर्त्यासाठी दीर्घ कालावधीसाठी सरासरी गुंतवणूक खर्च कमी होऊ शकतो.

यामुळे फोन पे वापरकर्त्याला कोणत्याही अडचणी शिवाय दीर्घ कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यास मदत होईल.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:तुमच्या कर्जाचा हप्ता वाढू शकतो! रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिले व्याजदर वाढवण्याचे संकेत

नक्की वाचा:Investment For Child: तुमची मुलं प्रौढ होईपर्यंत करोडपती करायचे असतील तर वापरा हे पर्याय, नक्कीच होईल फायदा

नक्की वाचा:Exlusive Offer: 4 जी मोबाईल एक्सचेंज केल्यास जिओफोन नेक्स्ट वर 2000 रुपयांची सूट

English Summary: now can investment 100 rupees in gold by phone pay launch sip
Published on: 26 May 2022, 03:55 IST