Others News

सध्याच्या काळात सर्व प्रकारच्या शासकीय कामांसाठी आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. यामुळे भारतीय म्हणून ओळखीसाठी आवश्यक असलेल्या या कार्डनं आपलं रुप बदललं आहे. आधी एका साध्या कागदप्रमाणे येणारे आधार कार्ड आता बँकेच्या एटीएम कार्ड सारखे दिसणार आहे. यामुळे या कार्डला आता लॅमिनेट करण्याची गरज नाही.

Updated on 13 October, 2020 2:23 PM IST


सध्याच्या काळात सर्व प्रकारच्या शासकीय कामांसाठी आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. यामुळे भारतीय म्हणून ओळखीसाठी आवश्यक असलेल्या या कार्डनं आपलं रुप बदललं आहे. आधी एका साध्या कागदप्रमाणे येणारे आधार कार्ड आता बँकेच्या एटीएम कार्ड सारखे दिसणार आहे. यामुळे या कार्डला आता लॅमिनेट करण्याची गरज नाही.याविषयीची माहिती युआयडीएआयने ट्विटर द्वारे दिली आहे. आता आधार कार्डला पीव्हीसी कार्डवर रिप्रिंट केले जाऊ शकते. विशेष म्हणजे आधारनं आपल्या रुपाप्रमाणे आपला आकारही बदलला आहे. आता हे कार्ड अगदी सहजगत्या आपल्या पॉकीटमध्ये सामावून जाणार आहे. आपल्या ट्विटमध्ये युआयडीएआयने म्हटलं की, आपले आधार आता सुविधाजनक आकारात असेल. यात तुम्ही सोप्या पद्धतीने आपल्या वॉलेटमध्ये ठेवू शकतात.

काय विशेषता आहे नवीन आधार कार्डात

आधार पीव्हीसी कार्ड पुर्णपणे वॉटर प्रुफ , शानदार प्रिंट आणि लॅमिनेटेड आहे. आता आधार कार्ड घेऊन जाणं सहज शक्य आहे. वॉटर प्रुफ असल्याने पावसातही आधार कार्ड आपण आपल्यासोबत खिशात ठेवू शकतो. दरम्यान तुम्ही आपल्या नव्या पीव्हीसी आधार कार्डला ऑनलाईन ऑर्डर करुन मागवू शकतात.

प्लॉस्टिक कार्डमधील नवा आधार टिकाऊ आहे. दिसण्यात आकर्षक आहे आणि सिक्योरिटी फीचर्सने पुरिपूर्ण आहे.  सिक्योरिटी  फीचर्समध्ये  होलोग्राम, गिलोच  पॅटर्न, घोस्ट इमेज आणि  मायक्रोटेक्स्ट असेल.  या कार्डला बनविण्यासाठी फक्त ५० रुपयांचा खर्च द्यावा लागेल.

कशाप्रकारे मिळवणार आधार कार्ड

  1. नव्या आधार पीव्हीसी कार्डसाठी आपल्याला युआयडीएआयच्या संकेतस्थळावर जावे लागेल.
  2. येथे 'My Aadhaar    या पर्यायात जाऊन ' Order Aadhaar PVC Card'  यावर क्लिक करावे लागेल.
  3. त्यानंतर तुम्ही तुमचा १२ अंकी नंबर किंवा १६ अंकी नंबरचे व्हर्च्युअल आयडी किंवा २८ अंकाचे आधार एनरोलमेंट आयडी टाकावे.
  4. आता तुम्ही सिक्योरिट कोड किंवा कॅप्चा भरावा आणि ओटीपीसाठी सेंट ओटीपीवर क्लिक करावे.
  5. त्यानंतर नोंदणीकृत असलेला तुमचा मोबाईलवर ओटीपी येईल. तो नंबर तेथे भरावा आणि सबमिट करावा.
  6. आता आपल्या आधार पीव्हीसी कार्डचं एक प्रीव्ह्यु आपल्या समोर असेल.
  7. त्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या पेमेंट पर्यायावर क्लिक करावे.
  8. यानंतर तुम्ही पेमेंट पेजवर जावे. तेथे तुम्हाला ५० रुपयांची फी जमा करावी लागेल.
  9. पेमेंट पुर्ण झाल्यानंतर आधार पीव्हीसी कार्डच्या ऑर्डरची प्रक्रिया पूर्ण होईल.

पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर युआयडीएआय पाच दिवसात आधार प्रिंट करुन भारतीय टपाल विभागाकडे सोपवेल. त्यानंतरत डाक विभाग स्पीड पोस्टद्वारे आपल्या घरापर्यंत आपले नवे आधार कार्ड पोहोचवेल. याशिवाय खाली दिल्या दिल्या गेलेल्या  लिंकवरुनही ऑनलाईनने आधारची ऑर्डर देऊ शकतात.  https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint

हेही वाचा : आधार कार्ड खरे आहे की Fake ? कसे ओळखाल आपले आधार; जाणून घ्या ! पद्धत

आधार कार्डसाठी लागणारी कागदपत्रे

UIDAI ने  आधार अपडेट करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील याची माहिती दिली आहे. UIDAI ने सांगितले आहे कीआपल्या आधार मध्ये नाव, पत्ता, किंवा जन्म तारीख अपडेट करायचा असेल तर पुरविण्यात आलेली कागदपत्रांमध्ये आपले नाव, पत्ता, हे बरोबर आहे ना हे तपासून घेणे. दरम्यान UIDAI ने ३२  कागदपत्रांची यादी दिली आहे. हे ओळखीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यातील कोणतेही कागदपत्र अपडेटसाठी उपयोगात येऊ शकतील.

दरम्यान UIDAI ने याआधी सांगितले होते की, फोटोग्राफ, बायोमेट्रिक्स, लिंग, मोबाईल, नंबर, आणि ईमेल आयडीच्या अपडेटसाठी कोणतेही कागदपत्र लागणार नाही. यासाठी आपण आपल्या जवळील आधार केंद्रावर जावे लागेल, त्यासाठी आपण भेटीची वेळ ठरु शकतात.

English Summary: Now Aadhar card will look like ATM card, get new card this way
Published on: 13 October 2020, 02:23 IST