भारतातील नागरिकांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवणे सोयीचे व्हावे म्हणून यासाठी भारतीय रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता रेल्वे स्टेशनवर आधार कार्ड तसेच पॅन कार्ड बनवता येणार आहे शिवाय त्याच्यात अपडेट देखील करता येणार आहेत.
आता रेल्वे स्टेशन वरती कॉमन सर्विस सेंटर वरती मिळणाऱ्या सर्व सेवा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. कॉमन सर्विस सेंटर अर्थात आपले सेवा केंद्र हे ट्रायल स्वरूपात उत्तर प्रदेश राज्यातील रेल्वे स्टेशन वर सुरू करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश राज्यातील प्रयाग राज आणि वाराणसी या दोन रेल्वे स्टेशन वर कॉमन सर्विस सेंटर अर्थात आपले सेवा केंद्र सुरू करण्यात येत आहे.
वाराणसी आणि प्रयागराज सारखेच देशातील इतर रेल्वे स्टेशन वर देखील कॉमन सर्विस सेंटर सारखी कियोस्क सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेला रेलवायर किओस्क असे संबोधले जात आहे. हे कॉमन सर्विस सेंटर ग्रामीण स्तरावरील कॉमन सर्विस सेंटर चालकाद्वारे संचालित केली जाते. रेल्वेवर सुरू केल्या जाणाऱ्या कॉमन सर्विस सेंटर वर आपण रेल्वे तिकीट बुकिंग, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड काढले जाऊ शकतात. मोबाईल रिचार्ज, वीज बिल भरणा, विमा भरणा इन्कम टॅक्स भरणा इत्यादी प्रकारचे कार्य केले जाऊ शकतात.
रेल्टेल जवळपास दोनशे रेल्वे स्टेशन वर कॉमन सर्विस सेंटर उभारणार असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी 44 दक्षिण मध्य रेल्वेमध्ये, 20 ईशान्य सीमा रेल्वेमध्ये, 13 पूर्व मध्य रेल्वेमध्ये, 15 पश्चिम रेल्वेमध्ये, 25 उत्तर रेल्वेमध्ये, 12 पश्चिम मध्य रेल्वेमध्ये, 13 पूर्व कोस्ट रेल्वेमध्ये आणि 56 ईशान्य रेल्वेमध्ये उभारणार आहेत. म्हणजे एकंदरीत या कॉमन सर्विस सेंटरचा दोनशे रेल्वे स्टेशन वरील नागरिकांना फायदा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 09 January 2022, 12:44 IST