नोकिया ही स्मार्टफोन क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी असून या कंपनीने लोकांच्या खिशाला परवडेल अशा बजेटमध्ये भरपूर वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे.या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये देण्यात आले असून या फोनची सुरुवातीची किंमत 9999 रुपये ठेवण्यात आलेली आहे. या लेखात आपण या स्मार्टफोनबद्दल महत्वपूर्ण माहिती घेऊ.
नोकियाने लॉन्च केला Nokia C31 स्मार्टफोन
नोकिया कंपनीने हा स्मार्टफोन दोन प्रकारात लॉन्च केला असून यामध्ये एक प्रकार हा तीन जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरियंटचा असून त्याची किंमत 9999 रुपये आहे तर दुसऱ्या प्रकार हा चार जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजचा असून त्याची किंमत दहा हजार 999 रुपये आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 13 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, दोन मेगापिक्सल आणि दोन मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये पाच मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनच्या मागील बाजूवर एलईडी फ्लॅश देण्यात आले आहेत. या फोनला चार्जिंग पॉवर देण्यासाठी 5050mAh बॅटरी देण्यात आली असून याची बॅटरी लाईफ एका चार्ज मध्ये तीन दिवसांची आहे असा कंपनीने दावा केला आहे. तसेच सुरक्षेसाठी फेस अनलॉक आणि फिंगर प्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटी साठी वायफाय, साडेतीन मिमी हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ, मायक्रो यूएसबी पोर्ट तसेच 4 जी कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध आहे. हा तीन रंगांमध्ये उपलब्ध असून एक म्हणजे चारकोल, मिंट आणि सायन कलर या तीन रंगांच्या पर्यायात हा फोन येतो.
Published on: 17 December 2022, 08:35 IST