नोकिया स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने सणासुदीच्या तोंडावर भारतामध्ये लो बजेट 'G11 Plus' स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा 4G स्मार्टफोन असून यामध्ये साडेसहा इंचाचा फुल एचडी + स्क्रीन वर येणार आहे. तसेच नोकिया कंपनीने तीन दिवस याची बॅटरी बॅकअप राहील असा दावा केला आहे. या लेखामध्ये आपण नोकियाच्या परवडण्याजोग्या लो बजेट स्मार्टफोन विषयी माहिती घेऊ.
नोकिया G11 प्लस स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
कमी बजेटमध्ये असलेला स्मार्टफोन असून डुएल सिम प्रकारांमध्ये भारतात विक्रीसाठी लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये चार जीबी रॅम 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
मेमरी कार्ड च्या मदतीने हे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येते. मोबाईल मध्ये 10W USB Type-C फास्ट चार्जरसह 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. मागच्या कॅमेरा मध्ये 50 मेगापिक्सल AI समर्थ प्राथमिक सेन्सर आणि दोन मेगापिक्सल खोलीचा कॅमेरा आहे.
या स्मार्टफोनचे मागच्या बाजूस एलईडी फ्लॅश उपलब्ध असून हे नॅनो आणि डुएल स्टॅन्ड बाय सीम मध्ये बसण्यास सक्षम असेल. यामध्ये 3.5mm हेडफोन जॅक असेल तसेच वाय फाय, 4 G कंनेक्टिविटीसह ब्लूटूथ, एफएम रेडिओ कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे तसेच रियर माऊंटेड फिंगरप्रिंट, एक्सलेरोमिटर आणि प्रॉक्सीमिटी सेंसर देखील उपलब्ध आहे.
मोबाईल लेक ब्ल्यू आणि चार्कॉल ग्रे कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
किती आहे या मोबाईलची किंमत?
नोकिया G11 प्लसची किंमत 12 हजार 499 रुपये आहे.
Published on: 16 October 2022, 06:47 IST