आपण अनेक प्रकारचे अँप्स वापर करतो. या प्रत्येक अँप्सचा पासवर्ड लक्षात ठेवणे आपल्यासाठी कधीकधी खूप कठीण होते. Google, Apple आणि Microsoft या कंपन्यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, आता Google, Apple आणि Microsoft सर्व अकाऊंट आणि सुविधांमध्ये पासवर्डशिवाय लॉग-इन करू शकणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
आजकाल डिजिटायझेशनचे युग आले आहे. लोक Google Pay, Phone Pay, Bhim, Patym सारखे अँप्स अधिक वापरायला लागले आहेत, अशा परिस्थितीत प्रत्येकाचा पासवर्ड लक्षात ठेवणे थोडे कठीण आहे. हे पासवर्ड आमची खाती सुरक्षित ठेवतात.
जगातील तीन आघाडीच्या टेक कंपन्या, गुगल, ऍपल आणि मायक्रोसॉफ्ट यांनी एकत्रितपणे घोषणा केली आहे, की ते एक अशी सेवा घेऊन येत आहेत ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यांमध्ये पासवर्डशिवाय लॉग इन करता येईल. तुम्ही या आणि इतर सर्व सेवा वापरण्यास सक्षम असाल. त्यांची ही घोषणा लोकांना खूप आवडत आहे.
'या' यूजर्सना नव्या बदलाचा फायदा मिळणार आहे
गुगल, ऍपल आणि मायक्रोसॉफ्टच्या या नवीन बदलाचा वापर प्रत्येक उपकरण आणि ऑपरेटिंग सिस्टमचे यूजर्स करू शकतील. अँड्रॉइड, आयओएस, क्रोम-ओएस, क्रोम ब्राउझर, एज, सफारी आणि मॅक-ओएस या सर्व प्लॅटफॉर्मचे वापरकर्ते या पासवर्डलेस ऑथेंटिकेशनचा लाभ घेऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. हे नवीन फीचर तुम्ही तुमच्या स्मार्टफोन, डेस्कटॉप, ब्राउझर डिव्हाईसवर सर्वत्र वापरू शकता.
"हा" विशेष कोड वापरावा लागेल
तुमच्या Google, Apple आणि Microsoft खात्यांमध्ये साइन इन करण्यासाठी, तुम्हाला क्रिप्टोग्राफिक टोकन किंवा FIDO (फास्ट आयडी ऑनलाइन) क्रेडेंशियल वापरावे लागेल. अशा प्रकारे, तुम्ही पासवर्डशिवाय तुमच्या खात्यात लॉग इन करू शकाल.
Indian Railways : कामाची बातमी : रेल्वे मधील सीट आणि टीसीचे नियम जाऊन घ्या...
हे फीचर कसे काम करेल ते जाणून घ्या
या टेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पासवर्डशिवाय वापरकर्ते त्यांच्या खात्यात सहजपणे लॉग इन करू शकतील. तसेच त्यांचे स्मार्टफोन अनलॉक करू शकतील. जसे तुम्ही तुमचा फोन पिन, पासवर्ड किंवा पॅटर्नने अनलॉक करता, त्याचप्रमाणे तुम्ही आता तुमच्या ऑनलाइन खात्यांमध्ये लॉग इन करू शकाल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हे फीचर तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासापासून तर वाचवेलच, पण हॅकर्ससाठी असे लॉगिन आणि अकाउंट हॅक करणे अधिक कठीण होईल, म्हणजेच तुम्ही ऑनलाइन फसवणूकीपासूनही सुरक्षित राहाल.
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ! DA वाढू शकतो, जाणून घ्या किती वाढणार...
Published on: 08 May 2022, 04:15 IST