Others News

ग्रामीण भागात आजही मुली आणि महिलांवर सामाजिक बंधने आहेत. परंतु आता समाज बदलत चालला आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नात राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषेत घोड्यावरून वरात काढून नवा आदर्श निर्माण केला आहे.

Updated on 10 May, 2022 9:59 AM IST

ग्रामीण भागात आजही मुली आणि महिलांवर सामाजिक बंधने आहेत. परंतु आता समाज बदलत चालला आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नात राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषेत घोड्यावरून वरात काढून नवा आदर्श निर्माण केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोणी येथील अल्पभूधारक शेतकरी गुणवंतराव खंदारे व सविता गुणवंतराव खंदारे यांची उच्चशिक्षित ज्येष्ठ कन्या निशिगंधा हिचा विवाह विठ्ठलराव खडसे व शोभा विठ्ठल खडसे (रा. कवधळ, जि. वाशिम) यांचा मुलगा सागर यांच्याशी झाला.

मात्र, या लग्नाच्या निमित्ताने अल्पभूधारक शेतकरी गुणवंत खंदारे यांनी आपल्या मुलीच्या इच्छेखातर गावातून वाजत गाजत वरात काढण्याचा निर्णय घेतला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारणार असल्याचे वधू निशिगंधाने सांगितले होते. त्यानुसार तिने नऊवारी पातळ, फेटा आणि तलवार असा पोशाख परिधान करत राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली.

लढवय्या असलेल्या राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श आपल्यासमोर आहे. त्यामुळेच लग्नाच्या निमित्ताने ही भूमिका साकारत असल्याचे वधू निशिगंधाने सांगितले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात गावातून तिची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने निशिगंधाचे स्वागत लोणीच्या सरपंच प्रिया अमोल वारंगे यांनी केले. गावातील पुरुष प्रधान संस्कृतीला आणि स्रियांना समान वागणूक मिळण्यासाठी असे उपक्रम गरजेचे असल्याचे मत अनेकजन व्यक्त करताहेत. 

या लग्नाची व विशेष म्हणजे या वरातीची आर्णी तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यात चर्चा झाली. आजही प्रत्येक गावात लग्नाच्या वेळी वराची घोड्यावर बसून वरात काढली जाते. परंतु इथे मुलीची घोड्यावर बसवून  मिरवणूक काढून या शेतकऱ्याने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. समाजात पुरुष व महिला भेदभाव मिटवण्यासाठी असे कार्यक्रम गरजेचे आहेत असे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
Weather Maharashtra: असनी चक्रीवादळ उद्या ओडिसा आणि आंध्रमध्ये दाखल होणार; महाराष्ट्रात या ठिकाणी बरसणार पावसाच्या सऱ्या 
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सातवा वेतन आयोगाचा थकबाकीचा तिसरा हप्ता लवकरच मिळणार

English Summary: Next separate; The farmer who takes out the bride at the girl's wedding
Published on: 10 May 2022, 09:59 IST