Others News

पॅन कार्ड (Pan Card) भारतातील नागरिकांचे (Indian Citizen) एक महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. याचा वापर सर्वाधिक वित्तीय कामांसाठी केला जातो. बँकेत (Banking Sector) खाते ओपन करण्यापासून ते आयकर भरण्यापर्यंत सर्व ठिकाणी पॅन कार्डला आता बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पॅन कार्ड आता प्रत्येकासाठी आवश्यक बनले आहे.

Updated on 08 May, 2022 7:12 PM IST

पॅन कार्ड (Pan Card) भारतातील नागरिकांचे (Indian Citizen) एक महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. याचा वापर सर्वाधिक वित्तीय कामांसाठी केला जातो. बँकेत (Banking Sector) खाते ओपन करण्यापासून ते आयकर भरण्यापर्यंत सर्व ठिकाणी पॅन कार्डला आता बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पॅन कार्ड आता प्रत्येकासाठी आवश्यक बनले आहे.

भारतात बँकिंग कामासाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही वापरत असलेले पॅन कार्ड असली आहे कां नकली हे तुम्हाला माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण अलीकडे पॅन कार्डमध्ये मोठा फर्जीवाडा उघडकीस आला आहे. यामुळे ओरिजनल किंवा डुप्लिकेट पॅन कार्ड कसे ओळखायचे याविषयी आज आपण जाणुन घेणार आहोत.

महत्वाच्या बातम्या:

Small Business Idea 2022: कमी खर्चात सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा महिन्याला 10 लाख; विश्वास नाही बसत मग एकदा वाचाच

Cheapest Scooter: ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केली की धावते तब्बल 75 किलोमीटर; किंमत आहे मात्र 50 हजार

पॅन कार्ड ओरिजिनल आहे की बनावट

पॅन कार्ड ओरिजिनल आहे की बनावट यामधील फरक जाणणे अतिशय सोपे आहे. मित्रांनो यासाठी आपणांस आपल्या स्मार्टफोनचा वापर करावा लागणार आहे. पॅन कार्ड खरे आहे की खोटे हे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे अगदी सहजरीत्या जाणुन घेऊ शकता. खरं पाहता, पॅन कार्डवर बनवलेला QR कोड तुम्हाला या कामात मदत करणार आहे.

यासाठी स्मार्टफोनचा कॅमेरा 12MP चा असावा 

या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त पॅन कार्ड आणि एक स्मार्टफोन हवा आहे.

लक्षात ठेवा स्मार्टफोनचा कॅमेरा किमान 12 MP चा लागणार आहे.

याशिवाय तुम्हाला आयकर विभागाचे एक अँप्लिकेशन डाउनलोड करावे लागणार आहे.

यानंतर, अँप्लिकेशनद्वारे पॅन कार्ड स्कॅन करून, तुम्ही ते खरे आहे की बनावट हे शोधू शकता.

पॅन कार्ड खोटे आहे की खरे आहे या स्टेप्सने जाणुन घ्या 

पायरी 1: तुमच्या स्मार्टफोनवरील 'प्ले स्टोअर' वर जा आणि 'पॅन क्यूआर कोड रीडर' शोधा.

पायरी 2: त्यानंतर NSDL ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने विकसित केलेले हे अँप्लिकेशन डाउनलोड करा.

पायरी 3: 'PAN QR Code Reader' अँप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ते उघडा.

पायरी 4: एकदा 'पॅन क्यूआर कोड रीडर' अँप्लिकेशन लोड झाल्यानंतर, तुम्हाला कॅमेरा व्ह्यूफाइंडरवर (Camera Viewfinder) हिरवा रंगाच + सारख चिन्ह दिसेल.

पायरी 5: तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यात तपासायचे असलेल्या पॅन कार्डचा QR कोड दाखवा.

पायरी 6: कॅमेरा QR कोड शोधताच, तुम्हाला स्मार्टफोनमध्ये बीप आवाज आणि कंपन जाणवेल.

स्टेप 7: यानंतर पॅन कार्डचा तपशील दिसेल. अँप्लिकेशन मध्ये दाखवलेले तपशील कार्डशी जुळतात का ते तपासा. जर ते थोडे वेगळे असेल तर तुमचे पॅन कार्ड बनावट राहणार आहे.

पायरी 8: जर तुमच्या स्वतःच्या पॅन कार्डमध्ये वेगळी माहिती दिसली, तर तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटवरून नवीन पॅनकार्ड मागवावे लागेल.

2018 मध्ये पॅन कार्डची नवीन रचना अपडेट 

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आयकर विभागने जुलै 2018 मध्ये पॅन कार्ड नवीन डिझाइनसह अपडेट केले आहे.

नवीन QR कोड पूर्वीच्या QR पेक्षा थोडा वेगळा आहे आणि त्यात पॅनकार्ड धारकाच्या फोटोसह इतर माहिती लपलेली आहे. मात्र असे असले तरी जुने QR कोडं नसलेले पॅन कार्ड देखील वैध अर्थात ओरिजिनल आहे.

English Summary: News of work! Original or duplicate PAN card you are using? Now the camera of your mobile will tell; Read about it
Published on: 08 May 2022, 07:12 IST