Others News

Petrol Diesel Price: देशात महागाईचा भडका उडाला असताना एकीकडे सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. शनिवारी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग ७९ व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही.

Updated on 07 August, 2022 10:32 AM IST

Petrol Diesel Price: देशात महागाईचा भडका उडाला असताना एकीकडे सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. शनिवारी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर केले आहेत. या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग ७९ व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या, ब्रेट क्रूड प्रति बॅरल सुमारे $100 आहे. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise duty) प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

शेतकऱ्यांनो सावधान! भाजीपाला काढणीच्या वेळी करू नका या चुका अन्यथा होईल मोठे नुकसान

सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.

फक्त ४ दिवस बाकी! भातशेती करता आली नाही, नो टेन्शन; मिळतायेत 7000 हजार, करा अर्ज

देशातील मुख्य शहरात पेट्रोल डिझेलचे आजचे दर

दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर : पेट्रोल १०३.१९ रुपये आणि डिझेल ९४.७६ रुपये प्रति लिटर.
चंदीगड : पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर.
लखनौ : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर.
नोएडा : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर.
पाटणा : पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: ९७.१८ रुपये आणि डिझेल ९०.०५ रुपये प्रति लिटर.

महत्वाच्या बातम्या:
खुशखबर! सोने खरेदीदारांचे अच्छे दिन, सोने चांदी झाले इतक्या रुपयांनी स्वस्त...
पुढील ३ दिवस पावसाचेच! या राज्यांमध्ये धो धो पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी

English Summary: New rates of petrol diesel announced
Published on: 07 August 2022, 10:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)