Others News

Petrol Diesel Price: देशात महागाई वाढत आहे. मात्र महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आज सलग ७८ वा दिवस असून या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे.

Updated on 06 August, 2022 9:24 AM IST

Petrol Diesel Price: देशात महागाई वाढत आहे. मात्र महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून (State Oil Companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आज सलग ७८ वा दिवस असून या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे.

यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise duty) प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे ट्विट; या दिवशी मिळणार 12व्या हप्त्याची रक्कम

यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.

मालामाल करणारी शेती! फणसाची लागवड ठरणार फायदेशीर, शेतकऱ्यांनो जाणून घ्या सगळी माहिती

मुख्य शहरातील आजची किंमत

दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७. रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.

महत्वाच्या बातम्या:
सणासुदीच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या दरात घसरण! सोने 4100 आणि चांदी 22600 रुपयांनी स्वस्त
अरे व्वा! आता वीज आणि इंधनाशिवाय शेतकरी करणार शेती, या यंत्रामुळे काम झाले सोपे

English Summary: New rates of petrol diesel announced by government oil companies!
Published on: 06 August 2022, 09:24 IST