पूर्वी झाडांना अनन्यसाधारण असं महत्व होतं. मात्र काळाच्या ओघात देश विकासकामांसाठी झाडांचा नायनाट करायला सुरुवात झाली. तसे त्याचे गंभीर परिणाम देखील आपण भोगले आहेतच. मात्र तरीही रस्ते बांधकाम असेल किंवा मोठ मोठी घरे बांधणे असो, असे एक ना अनेक गोष्टींसाठी झाडांचा बळी दिला जातो. मात्र असं असताना या सगळ्यांना लाजवेल अशी घटना समोर आली आहे.
आपलं स्वप्नातलं घर बांधण्यासाठी झाड आडवे येत होते मात्र त्याचाच आधार घेत उदयपूरमधील एका व्यक्तीने 4 मजली सुंदर घर बांधलं आहे. हे घर पाहून घर बांधणाऱ्या व्यक्तीचं सगळेचजण कौतुक करत आहेत. घर बांधताना 40 फूट उंच आंब्याचे झाड मधे येत होते. मात्र ते झाड न कापता त्याच जागेवर या व्यक्तीने आकर्षित करणारं 4 मजली घर बांधलं आहे.
सध्या सोशल मीडियावर हे घर सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.आता हे घर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनून गेलं आहे. शाही राजवाडे, सुंदर मंदिरे आणि बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरमधील हे घर आहे. कुल प्रदीप सिंग नामक व्यक्तीने आंब्याचे 80 वर्ष जुनं आणि 40 फूट उंच असलेलं झाड न तोडता सन 2000मध्ये हे घर बांधलं. कुल प्रदीप सिंग पेशाने आयआयटी इंजिनीअर आहेत.
ऊस, कांदा उत्पादकांच्या व्यथांचा भोंगा कोण वाजवणार! तुम्हाला फक्त मतदानाला विचारणार
आता या घराला 'ट्री हाऊस' म्हणून नावाजले जाते. तसेच हे घर 'फुल फर्निश्ड' असून घर बांधण्यासाठी अभियंता कुल प्रदीप सिंग यांनी झाडाची एक फांदीदेखील तोडली नाही. यातूनच त्यांचे पर्यावरण प्रेम सिद्ध होते. अभियंता कुल प्रदीप सिंग यांनी हे घर जमिनीपासून 9 फूट उंचीवर बांधले आहे. विशेष म्हणजे या घराची उंची सुमारे 40 फूट इतकी आहे.
आता निसर्गानेही सोडली शेतकऱ्यांची साथ, अतिरिक्त ऊसावर पावसाची अवकृपा
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे 4 मजली घर बांधण्यासाठी त्यांनी सिमेंटचा अजिबात वापर केला नाही. त्या जागी स्टील, सेल्युलर आणि फायबर शीट वापरून हे घर बांधण्यात आले आहे. तसेच या घराची रचना झाडाच्या फांद्यांनुसार करण्यात आली आहे. त्यांनी सोफा स्टँड आणि टीव्ही स्टँड म्हणून डहाळीचा वापर केला आहे.
तसेच इतर घरांप्रमाणे या घरात देखील स्वयंपाकघर, बाथरूम, बेडरूम, डायनिंग हॉल आणि लायब्ररीसह सर्व सुविधा आहेत. तसेच चित्रांमधून किचन, बेडरुम, लायब्ररीतून झाडांच्या फांद्या बाहेर येत आल्याचे दिसून येते. शिवाय जेव्हा झाडाला आंबे येतात, तेव्हा ते घरामध्येही लटकलेले दिसतात. तसेच घरात अनेक खिडक्या बसवण्यात आल्या असल्यामुळे अनेक पक्षीही घरात येत राहतात.
महत्वाच्या बातम्या:
खाजगी डेअरीचालकांचा मनमानी कारभार; केली दूध खरेदीदरात मोठी घट
Published on: 23 May 2022, 12:13 IST