Others News

Oscar 2023 live updates : चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा सध्या लॉस एंजलिसमध्ये सुरू आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपटांनी मोहोर उठवली आहे. आरआरआर सिनेमातील नाटूनाटू या गाण्यानं ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.

Updated on 13 March, 2023 9:44 AM IST

Oscar 2023 live updates : चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा सध्या लॉस एंजलिसमध्ये सुरू आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपटांनी मोहोर उठवली आहे. आरआरआर सिनेमातील नाटूनाटू या गाण्यानं ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यावेळी अवॉर्ड प्रेझेंट करतानाही आपल्याला दिसणार आहे. दीपिका आधी प्रियांका चोप्रानं 2016 (Priyanka Chopra) आणि 1980 मध्ये पर्सिस खंबाटानंतर आता अवॉर्ड प्रेझेंट करणारी दीपिका तिसरी भारतीय असणार आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन हा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग
'Everything Everywhere All At Once'या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग हा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट ओरीजनल सॉंग
RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरीजनल सॉंग हा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले
'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटासाठी डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांना बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट व्हिजुअल इफेक्ट
अवतार या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट व्हिजुअल इफेक्ट हा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म हा ऑस्कर 'द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स'ला मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म
'The Elephant Whisperers'ला सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म हा ऑस्कर मिळाला आहे. ही भारतीय शॉर्ट फिल्म आहे.

English Summary: 'Natu Natu' song worldwide hit; Oscar Award for Best Original Song
Published on: 13 March 2023, 09:44 IST