Others News

देशातील शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर काम करताना सरकारने राज्यांमध्ये एग्री- बिझनेसचे केंद्र सुरू केले आहेत.

Updated on 07 April, 2020 11:05 AM IST


देशातील शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.  याच पार्श्वभूमीवर काम करताना सरकारने राज्यांमध्ये  एग्री - बिझनेसचे केंद्र सुरू केले आहेत.  यादरम्यान  सरकार शेतीच्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहे.  ज्यात पीक-पिकाचे व्यवस्थापन, मातीचे आरोग्य, पीक व्यवस्था, झाडेची सुरक्षा, पीक उपसा साठवण, जनावरांसाठी उपचाराची सुविधा आणि रोजगाराच्या रोजगारासह भारताच्या कृषी परिस्थितीला चालना देत आहे.  

एग्रो क्लिनिक्स आणि  एग्री बिझनेस सेंटर्स पूर्ण देशात स्थापित करण्यात आले आहेत.   शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा,यासाठी सरकारने या योजनाची सुरुवात केली आहे.  एग्रो क्लिनिक आणि एग्री बिझनेस सेंटर ही योजना शेतीत आपले करिअर करणाऱ्या बारावी किंवा पदवी झालेल्या उमेदवारांसाठी आहे.  इच्छुक उमेदवारांना ४५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.   प्रत्येक राज्यात या संस्था स्थापित करण्यात आल्या आहेत. https://www.acabcmis.gov.in/ApplicantReg.aspx. या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अधिकची माहिती मिळेल.  प्रशिक्षण देणाऱ्या संस्था या नॅशनल एग्रीकल्चर  एक्सटेंशन मॅनेजमेंट इन्स्टिटूट (MANAG) शी संचलित आहेत.  या संस्था कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. स्थानिक गरजा आणि शेतकऱ्यांचे गटांना लक्ष्य करुन शेतकऱ्यांना काही शुल्कावर किंवा विना शुल्क सेवा दिल्या जात आहेत.  कृषी पदवीधर, कृषी पदविका धारक कृषी आणि जैवविज्ञान शाखेत कृषी संबंधित कोर्स मध्ये पदव्युत्तर पदवी घेणारे. यातील बेरोजगार व्यक्तींना या योजनेच्या मदतीने स्वंयरोजगार मिळेल.

नाबार्ड AC& ABC Scheme साठी देणार २० लाखांचे कर्ज - प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर उमेदवारास व्यवसाय सुरू करण्यासाठी नाबार्डकडून कर्ज दिले जाते. नाबार्ड उमेदवारास साधारण २० लाखांचे कर्ज पुरवते. जर पाच जणांचा ग्रुप असेल तर १ कोटीच्या कर्जाचीही पुर्तता नाबार्डकडून केली जाते. विशेष म्हणजे नाबार्ड यावर सब्सिडी देखील देते, जनरल वर्गासाठी ३६ टक्के तर एससी आणि एसटी साठी ४४ टक्क्यांची सब्सिडी मिळते.

प्रशिक्षणसाठी कसा कराल अर्ज -
एग्रो क्लिनिक आणि एग्री बिझनेस चालू करण्याआधी प्रशिक्षणासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. दरम्यान अर्जदार आपल्या सोयीनुसार प्रशिक्षण केंद्र निवडू शकतात. यासंदर्भतील अधिक माहितीसाठी शेतकरी 1800-425-1556 या टोल फ्री नंबर संपर्क करु शकतात. अर्ज करण्यासाठी या लिंकवर जा. - https://www.acabcmis.gov.in/ApplicantReg.aspx अर्ज करताना आधार कार्ड, शिक्षणाचे प्रमाणपत्र, फोटो, बँकेचे पासबुक हे कागदपत्रे आवश्यक आहेत.

English Summary: NABARD is Giving Loan up to 20 Lakhs to Start Profitable Agri-business and Agri-Clinic
Published on: 06 April 2020, 06:35 IST