सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या फीचर्स सहित असलेले स्मार्टफोन येत आहेत. यामध्ये देखील भरपूर स्पर्धा असून नेमका कुठला स्मार्टफोन उत्तम हेदेखील ठरवणे कठीण जाते.
सध्या बाजारामध्ये मोटोरोलाचा मोटोरोला एज 30 प्रो बाजारात लॉंच करण्यात आला. हा एक स्नॅपड्रॅगन 8 gen 1 प्रोसेसर सह 68Wफास्ट चार्जिंग देण्यात आले आहे.तसेच आठ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे.या लेखामध्ये आपणया स्मार्टफोनची वैशिष्ट्येआणि किंमत जाणून घेऊ.
Motorola Edge 30 Pro वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड बारा आहे.1080×2400 पिक्सल रेसोल्युशन आणि 144Hzच्यारिफ्रेश रेट्सह 6.7 चिंचा चा फुल एचडी+POLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले 2.5Dवक्र गोरिल्ला गलास तीन द्वारे संरक्षित आहे. तसेच त्या फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 8 GEN 1प्रोसेसर सह आठ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे.जर या फोनचा कॅमेरा चा विचार केला तर यामध्ये तीनरियर कॅमेरा आहेत ज्यात प्राथमिक लेंस50 मेगापिक्सल आहे
ज्यामध्ये कॅप्चर f/1.8आहे.या कॅमेरा चा लेंस सर्व दिशात्मक ऑटो फोकस सह येते. याशिवाय ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझर देखील समर्थीतआहे.तसेच दुसरी लेन्स 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगलची आह आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे.समोर साठ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. जर या फोनचा बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर या फोनला 68W टर्बो पावर जलदचार्जिंग साठी समर्थना सह 4800mAhबॅटरी पॅक करते. अवघ्या पंधरा मिनिटात 50% बॅटरी चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. तसेच या फोन सोबत 15Wवायरलेस चार्जिंग देखील उपलब्ध असेल. तसेच यामध्ये डॉल्बी ऑटोमॉसचार समर्थनासाठी ड्युअलस्टिरिओ स्पीकर्स आहेत.
यामध्ये तीन मायक्रोफोन आहेत त्यासोबतच फोनमध्ये साऊंड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
या फोनची किंमत
Motorola Edge 30 Pro ची किंमत 49 हजार 999 रुपये आहे. हा फोन कॉस्मोस ब्लू आणि स्टारडस्ट व्हाईट रंगात खरेदी करता येईल. जर तुम्ही एस बी आय क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला पाच हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल.जिओ ग्राहकांना दहा हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील.
Published on: 13 March 2022, 02:48 IST