केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातवा हप्ता पाठवणे सुरू केले आहे. परंतु सरकारने आता बनावट आणि फसवणुकीच्या पद्धतीने योजनेचा फायदा उचलणाऱ्या शेतकऱ्यांवर वचक ठेवण्यास सुरुवात केली आहे. पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार करत असते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता पाठवला. या योजनेचा आत्तापर्यंतचा सातवा हप्ता एक डिसेंबर दोन हजार वीस पासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या वेळेस या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अगोदर पेक्षा भरपूर प्रमाणात कमी करण्यात आली आहे. यावेळेस पी एम किसान पोर्टल मध्ये या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकूण नऊ कोटी 97 लाख च्या आसपास राहिली आहे. अगोदर ही संख्या जवळजवळ अकरा करोड च्या आसपास होती.
मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी बनावट पद्धतीने या योजनेचा लाभ घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर सरकार द्वारे अशा शेतकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. तेव्हा बरेच शेतकरी या योजनेस पात्र असलेले आढळून आले होते. अशा पद्धतीचे बरेच प्रकरण महाराष्ट्र, एम पी आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये समोर आले होते. या योजनेच्या माध्यमातून पोहोचणारा सातवा हप्ता अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. त्याच्यामुळे होऊ शकते की, तुमचे नाव लिस्ट मधून रिमूव करण्यात आला आहे. या पोर्टल वरून नाव रिमू करण्याचे एक महत्वाचं कारण म्हणजे चुकीची माहिती आणि डेटा अपडेट न होणे हे सुद्धा असू शकते. जर तुम्ही या योजनेस पात्र असाल तर तुम्ही तुमचा डेटा जरूर तपासून पहावा. आताच्या परिस्थितीत पाहिले तर बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे आणि ते इन्कम टॅक्स भरतात. परंतु या योजनेनुसार अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल की ज्यांची जमीन आहे परंतु ते शेतकरी कर धारक नाहीत.
हेही वाचा:Kisan Credit Card: ड्यु डेट पर्यंत पेमेंट न केल्याने काय होते ? जाणुन घ्या कर्जाच्या अटी
पीएम किसान सम्मान निधि योजने मध्ये आपले नाव कसे चेक करावे?
सगळ्यात अगोदर म्हणजे पी एम किसान या योजनेच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जावे. होम पेज ओपन झाल्यानंतर मेनू बार मध्ये जावे आणि त्यामध्ये फार्मर कॉर्नर या ऑप्शन वर क्लिक करा. फार्मर कॉर्नर वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेजवर बेनिफिसिअरी लिस्ट या लिंक वर क्लिक करावे. त्यानंतर नवीन पण झालेल्या पेजवर तुमची स्वतःची पर्सनल डिटेल जसा की तुमच्या राज्याचं नाव, जिल्हा तुमचा तालुका इत्यादी विचारले जाते. त्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक करावे. त्यानंतर लिस्ट तुमच्यासमोर दिसते.
Published on: 07 December 2020, 05:38 IST