पोस्ट ऑफिसच्या अनेक निरनिराळ्या गुंतवणूक योजना असून गुंतवणूकदारांसाठी चांगले पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार हे कुठल्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना एवढीच अपेक्षा ठेवतात की त्यांची गुंतवणूक ही सुरक्षित असावी आणि मिळणारा परतावा हा परवडण्याजोगा असावा. याच धर्तीवर पोस्ट ऑफिसच्या अनेक आकर्षक योजना आहेत. त्यापैकी एका महत्त्वाच्या योजनेची माहिती या लेखात आपण घेऊ.
पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम
जर तुमच्या डोक्यात देखील गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम अर्थात मासिक उत्पन्न योजनेत करू शकता. ही योजना पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना असून या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला मासिक किंवा वार्षिक पैसे मिळतात.
तसे पाहायला गेले तर या योजनेचे स्वरूप पेन्शन योजने सारखेच आहे. यामध्ये तुम्ही एकदम एकरकमी पैसे जमा करून प्रति महिना स्वतःच्या आर्थिक उत्पन्नाची व्यवस्था त्या माध्यमातून करू शकतात. जर आपण या योजनेचा कालावधी पाहिला तर तो पाच वर्षाचा असून तुम्ही तुमच्या सोयीनुसार अजून पाच वर्षाची वाढ यामध्ये करू शकतात.
या योजनेतून मिळणारे व्याज आणि एकंदरीत स्वरूप
या योजनेवर वार्षिक 6.6 टक्के इतके व्याज मिळते व या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड पाच वर्षाचा आहे व त्यानंतर तुम्हाला प्रतिमहिना उत्पन्नाची हमी मिळते.
नक्की वाचा:सोने खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी! सोने 4700 रुपयांनी स्वस्त, पहा नवीन दर...
जर तुम्ही या योजनेमध्ये एक रकमी साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षानंतर तुम्हाला दरवर्षी 29 हजार 700 रुपये मिळतात.
हेच आर्थिक उत्पन्न जर तुम्हाला प्रतिमहिना हवे असेल तर तुम्हाला प्रति महिन्याला 2475 रुपये या माध्यमातून मिळतात. या योजनेमध्ये तुम्हाला जॉइंट अकाउंट देखील ओपन करता येते परंतु यासाठी तुम्हाला नऊ लाख रुपयांची गुंतवणूक यामध्ये करावी लागते.
यामध्ये तुमची व्याजाची रक्कम 59 हजार चारशे रुपये असते. या जॉईंट खात्यात गुंतवलेल्या पैशाच्या माध्यमातून जर तुम्हाला प्रतिमहिना पैसा घ्यायचा असेल तर तुम्ही चार हजार 950 रुपये तुम्हाला मिळू शकतात.
नक्की वाचा:7th Pay Commission: महागाई भत्त्याची आकडेवारी जाहीर; भत्ता किती वाढणार जाणून घ्या..
Published on: 01 August 2022, 07:19 IST