Others News

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) बंगालच्या उपसागरातील शाखेने पुढे चाल करत

Updated on 08 June, 2022 7:11 PM IST

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) बंगालच्या उपसागरातील शाखेने पुढे चाल करत मंगळवारी (ता. ७) तमिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे. मात्र केरळात वेळेआधी दाखल झाल्यानंतर वेगाने गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारणाऱ्या मॉन्सून वाटचाल थांबलेली आहे. महाराष्ट्रातील मॉन्सूनच्या आगमनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.यंदा नियमित सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधीच (२९ जून) देवभूमी केरळमध्ये आगमन झाले. त्यानंतर दोनच दिवसांत ३१ मे मॉन्सूनने संपूर्ण केरळ राज्य व्यापून कर्नाटक किनारपट्टी, 

दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडू, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. कारवार, चिकमंगळूर, बंगळूर, धर्मापुरीपर्यंतच्या भागात मॉन्सूनने वाटचाल केली आहे. त्यानंतर मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनने वाटचाल केलेली नाही. वाटचालीस पोषक हवामान नसल्याने महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमन लांबणार आहे.दरम्यान, मंगळवारी (ता. ७) मॉन्सूनच्या बंगालच्या उपसागरावरील शाखेने पुढे चाल केली आहे.पद्दुच्चेरी, कराईकलसह तमिळनाडूचा काही भाग,बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली आहे.

ईशान्य भारतातील राज्ये, सक्कीम तसेच पश्‍चिम बंगालच्या हिमालयाकडील भागातील मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.कोकणात साधारणत: ५ जूननंतर मॉन्सून दाखल होतो. त्यानंतर हळूहळू तो महाराष्ट्राच्या विविध भागांत दाखल होत असतो. यंदा केरळ आणि कर्नाटकात मॉन्सून लवकर आल्याने महाराष्ट्रातही त्याचे लवकर आगमन होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात होती. मॉन्सूनची प्रगती थांबल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

यंदा नियमित सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधीच (२९ जून) देवभूमी केरळमध्ये आगमन झाले. त्यानंतर दोनच दिवसांत ३१ मे मॉन्सूनने संपूर्ण केरळ राज्य व्यापून कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडू, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. कारवार, चिकमंगळूर, बंगळूर, धर्मापुरीपर्यंतच्या भागात मॉन्सूनने वाटचाल केली आहे. त्यानंतर मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनने वाटचाल केलेली नाही. वाटचालीस पोषक हवामान नसल्याने महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमन लांबणार आहे.

English Summary: Monsoon moves through the Bay of Bengal
Published on: 08 June 2022, 07:11 IST