Others News

केरळमध्ये वेळेआधी दाखल झाल्यानंतर मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाची प्रतिक्षा संपली आहे.

Updated on 14 June, 2022 2:45 PM IST

केरळमध्ये वेळेआधी दाखल झाल्यानंतर मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाची प्रतिक्षा संपली आहे. शुक्रवारी (ता. १०) संपूर्ण गोवा राज्य व्यापून तळ कोकणाच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या वेंगुर्ल्यापर्यंत मॉन्सूनने मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दोन दिवसात दक्षिण महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.यंदा नियमित वेळेच्या तीन दिवस आधीच (२९ मे ) मॉन्सूनचे देवभुमी केरळ मध्ये आगमन झाले आहे.

त्यानंतर दोनच दिवसांत मॉन्सूनने संपूर्ण केरळ राज्य, कर्नाटक किनारपट्टी व्यापून गोव्याच्या किनाऱ्यापर्यंत मजल मारली. त्यानंतर दोन दिवसात कोकणात दाखल होण्याची शक्यता असतानाच मॉन्सूनचा वेग मंदावला. संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी व्यापून गोव्याच्या उंबरठ्यावर पोचलेल्या मॉन्सूनने महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी १० दिवसांची वाट पहायला लागली. २०१९ मध्ये मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास २० जून तर २०२० मध्ये ११ जून उजाडला होता. तर गतवर्षी मॉन्सून ५ जून रोजी महाराष्ट्रात पोचला होता.

मॉन्सूनने शुक्रवारी (ता. १०) अरबी समुद्रावरून पुढे चाल करत संपूर्ण गोवा, दक्षिण कोकणचा काही भाग, कर्नाटकच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. राज्यात पूर्व मोसमी पावसानेही जोर धरला असून, मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान झाले आहे. उद्यापर्यंत (ता. १२) दक्षिण महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भाग, संपूर्ण तामिळनाडू, दक्षिण आंध्रप्रदेशासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

राज्यात पूर्व मोसमी पावसानेही जोर धरला असून, मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान झाले आहे. उद्यापर्यंत (ता. १२) दक्षिण महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भाग, संपूर्ण तामिळनाडू, दक्षिण आंध्रप्रदेशासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत (ता. १४) मॉन्सून संपूर्ण कर्नाटक व्यापून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात पोचण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमन वर्ष---आगमन२०१८---८ जून२०१९---२० जून२०२०---११ जून२०२१---५ जून२०२२---१० जून

English Summary: Monsoon enters Talakkonam; The whole of Goa is covered up to Vangurla
Published on: 14 June 2022, 02:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)