Others News

भारत हा कृषिप्रधान देश आहे. बहुसंख्य लोकसंख्या हे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीचा आणि पर्यायाने शेतकर्‍यांचा शाश्वत विकास व्हावा, याकरता मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे योजना आणल्या जात आहेत. सरकारचे उद्दिष्ट आहे की, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे.

Updated on 29 January, 2021 3:27 PM IST

भारत  हा कृषिप्रधान देश आहे. बहुसंख्य लोकसंख्या हे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीचा आणि पर्यायाने शेतकर्‍यांचा शाश्वत विकास व्हावा, याकरता मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे योजना आणल्या जात आहेत. सरकारचे उद्दिष्ट आहे की, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे.

 परंतु यासाठी जरी नवनवीन तंत्रज्ञान आणि विविध योजनांच्या माध्यमातून सरकार हे प्रयत्न करताना दिसत आहे. प्रयोजनमधील एक महत्त्वाची योजना म्हणजे आत्मा. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन त्या तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करण्याचे विशेष ट्रेनिंग दिले जाईल. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य पूर्ण होण्यास मदत होईल.

हेही वाचा : शेतकरी उत्पादक कंपनी तयार करत आहात का? वाचा ! आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती

आतापर्यंत आत्मा योजनेचा विचार केला तर या योजनेअंतर्गत जवळजवळ 57 लाख 56 हजार 402 शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये फार्म डेमॉन्स्ट्रेशन, कृषी मेळावे विविध तंत्रज्ञानाची ट्रेनिंग इत्यादींचा अंतर्भाव आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एखाद्या नवीन बियाणे आले तर या बियाणे संदर्भातील प्रॅक्टिकल या योजनेद्वारे मिळते. कोणतेही नवीन बियाणे कृषी विभाग पूर्वी कृषी विज्ञान केंद्राला मिळते. कृषी विज्ञान केंद्राकडून हे बियाणे शेतकऱ्यांच्या शेतात आणि आवारात लावले जाते.

कृषी विज्ञान केंद्राकडून बियाणे, कधी आणि औषध अशी सामुग्री पुरवली जाते. त्यानंतर ह्या बियाण्याच्या वाढीवर लक्ष पुरवले जाते. ज्या ठिकाणी अशा पिकांची लागवड केल जाते अशा ठिकाणी इतर शेतकऱ्यांनाही बोलावले जाते विशेष प्रकारची ट्रेनिंग दिली जाते.

 बऱ्याचदा असे होते की कृषी प्रयोगशाळेमध्ये यशस्वी ठरलेले बियाणे शेतात फेल होतात. त्यामुळे या योजनेअंतर्गत कृषी संशोधक आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय शिक्षणावर भर दिला जातो. जगाचा विचार केला तर चीन, जर्मनी, अमेरिका आणि कॅनडा यासारख्या राष्ट्रांमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरून शेती केली जाते. त्यामुळे तिकडच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होते.

परंतु आपल्याकडे शेतकरी परंपरागत पद्धत बदलण्यास सहसा तयार होत नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन बदल करण्याच्या दृष्टीने आत्मा ही योजना महत्वपूर्ण ठरेल.

English Summary: Modi government's Atma Yojana to double farmers' income 29 jan
Published on: 29 January 2021, 03:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)