दिवसेंदिवस तंत्रज्ञानात वाढ होत आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. या सोशल मीडियाच्या युगात दिल्लीची बातमी नव्हे नव्हे तर जगातील कुठल्याही कोपऱ्याची बातमी गल्लीपर्यंत पोहोचायला काही सेकंदाचा उशीर लागतो. यामुळे विचारांची देवाण-घेवाण करणे अधिक सोयीचे झाले आहे. याव्यतिरिक्त, सोशल मीडियामुळे तसेच ऑनलाइन शॉपिंग साईट मुळे खेडोपाड्यातील वस्तू मोठमोठ्या शहरात विकल्या जाऊ शकतात तसेच मोठ्या शहरातील वस्तू ग्रामीण भागात सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. ऑनलाइन शॉपिंग साईट मुळे कुठल्याही वस्तू विकत घेणे आता सोयीचे झाले आहे.
शेतकरी मित्रांनो आपण याच गोष्टीचा लाभ घेऊन शेणाच्या गोवऱ्या ऑनलाइन शॉपिंग साईट वर विक्री करून चांगला मोठा नफा कमवू शकता. खेडोपाड्यात आजही शेणाच्या गोवऱ्या इंधन म्हणून उपयोगात आणल्या जातात. याव्यतिरिक्त या गोवऱ्यांचा वापर धार्मिक कार्यात देखील मोठ्या प्रमाणात होत असतो. खेडोपाड्यात धार्मिक कार्यांसाठी गोवऱ्या सहजरीत्या उपलब्ध होऊन जातात. मात्र असे असले तरी, शहरात सहजरीत्या शेणाच्या गोवऱ्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सध्या ऑनलाईन शॉपिंग साईट वर शेणाच्या गोवऱ्या विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत. एवढेच नाही तर ऑनलाइन शॉपिंग साइटवर विक्रीसाठी ठेवलेल्या शेणाच्या गोवऱ्या अधिक किमतीत विकल्या जात आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी शेणाच्या गोवऱ्या विक्री करून चांगला मोठा नफा कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, अलीकडे अशा अनेक शॉपिंग साईट आहेत ज्यामध्ये शेणाच्या गोवऱ्या विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत. शेणाच्या गोवऱ्या धार्मिक कार्यात अत्यावश्यक असल्याने याची मागणी देखील वाढत आहे. होळीमध्ये, होम मध्ये, विविध सणांच्या दिवशी या शेणाच्या गोवऱ्यांची मोठी मागणी असते. विशेष करून गायीच्या शेना पासून तयार केलेल्या गोवऱ्या मोठ्या प्रमाणात मागणी मध्ये असतात.
ऑनलाइन शॉपिंग साईट ॲमेझॉन, मीशो, शॉप क्लूज, गो शास्त्र, शुभांजली यावरती शेणाच्या गोवऱ्या विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत. शेतकरी बांधव याचाच फायदा घेऊन या ऑनलाइन शॉपिंग साईट वरती शेणाच्या गोवऱ्या विक्री करून चांगला मोठा नफा कमवू शकतात. या ऑनलाइन शॉपिंग साइटवर शेणाच्या गोवऱ्यांना शंभर ते तीनशे रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे शेणाच्या गोवऱ्या विक्री करून शेतकरी बांधवांना चांगली मोठी कमाई करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे.
Published on: 13 March 2022, 10:33 IST