ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मारुती सुजुकी होळी पूर्वी बाजारामध्ये कंपनीचे लोकप्रिय दोन वाहने लॉन्च करण्याची शक्यता आहे. यामध्ये एरटिगा आणि ब्रिझा हे नवीन मॉडेल असतील. या दोन्ही मॉडेलमध्ये अपडेट वर्जन असे अनेक दिवसांपासून ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत.
त्यामुळे हे दोन्ही मॉडेलच्या अपडेट वर्जन लॉन्च करण्याची शक्यता आहे. या लेखामध्ये आपण या येणाऱ्या नवीन अपडेट वर्जन ची माहिती घेऊ.
नवीन इर्टिगा- नवीन एरटिगा फेसलिफ्ट चे अंतर्गत तपशील अद्याप उपलब्ध नाहीत. परंतु बाहेरील बदलांच्या अनुषंगाने विचार केला तर कार मध्ये आतील भागात काहीसे बदल दिसू शकतात. फेसलिफ्ट मॉडेल साठी कंपनी किमतीत किरकोळ वाढ करू शकते.सध्या या एमपीव्ही चीएक्स शोरूम किंमत सात लाख 97 हजार रुपये आहे.
- . रिपोर्टनुसार नवीन एरटिगा च्या केबिन मध्ये नवीन कलर अपहोलस्ट्रीआठ इंची टच स्क्रीन इन्फोटेनमेन्ट सिस्टम दिली जाऊ शकते ज्यामुळे इंटेरियर ला नवीन लुक दिला जाईल. तसेच यामध्ये वायरलेस फोन चार्जर, एप्पल कार प्ले सह अँड्रॉइड ऑटो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रंगीत मल्टी इन्फो डिस्प्ले, पुष बटन स्टार्ट विथ किलेस इंट्री आणि क्रूज कंट्रोल यांचा समावेश आहे. दोन एअर बॅग, एबीडी सह एबीएस आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखे सुरक्षा वैशिष्ट्य देखील उपलब्ध होणार आहेत.
- नवीन ब्रिजा- मारुती सुझुकी विटारा ब्रिजा ची एक नवीन एडिशन आणणार आहे. कंपन्यांमधून विटारा हे नाव काढेल आणि सब 4 मीटर एसयुवीला मारुती सुझुकी ब्रीझा म्हटले जाईल.
2022 मारुती ब्रीझा पेट्रोल वर्जन तसेच सीएनजी मध्ये सादर केली जाण्याची शक्यता आहे. नवीन पिढीच्या ब्रीजा सोबत कंपनीला नवीन आलोय विल्स, स्क्वेअर व्हीलआर्च, जाड बोडी कॅलेडींग, ब्लॅक डोअर मोल्डिंग, टर्न इंडिकेटर्स रियर व्ह्यू मिरर आणि रंगीत डोअर हँडल देण्यात आले आहेत. नवीन ब्रिज आचा मागील भाग देखील लक्षणीयरित्या बदलला आहे ज्यामध्ये रॅपराउंड टेल लॅम्प आणि त्यावर ब्रिजा लिहिलेली एक विस्तृत क्रोम पट्टी आहे.
Published on: 04 March 2022, 11:00 IST