भारताचा शेजारी राष्ट्र आणि अखंड भारताच्या फाळणीतून निर्माण झालेला पाकिस्तान सध्या एका मोठ्या आणि विचित्र अडचणीत सापडल्याचे बघायला मिळत आहे. पाकिस्तान नेहमीच भारताविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य करण्यास मर्दानगी समजत असतो, परंतु त्यांनी भारताविरुद्ध विष पसरवण्याऐवजी त्यांच्या देशात चालत आलेल्या रूढी परंपरा ला आळा घालणे अनिवार्य झाले आहे. नात्यांमध्ये विवाह केल्याने मोठ्या प्रमाणात अनुवांशिक रोगांची जडण-घडण होत असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानात सर्वात जास्त विवाह बंधने हे नात्यांमध्ये होत असतात. एवढेच नव्हे स्वतःला सुशिक्षित समजणारे पाकिस्तानातील कला विश्वातील कलाकार, राजकारणातील बड्या हस्ती यांनी देखील नात्यांमध्ये विवाह बंधन केले आहे. या नात्यांमध्ये होत असलेल्या विवाह मुळे अनुवांशिक रोगांची लवकर लागण होत असल्याची शास्त्रीय माहिती आता समोर आल्याने पाकिस्तानची पिढी बरबाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकमतच्या माहितीनुसार, पीओके मध्ये वास्तव्यास असलेले शिक्षक म्हणून कार्यरत असलेले गफूर हुसेन शाह 56 वर्षाचे आहेत त्यांचे त्यांच्या नात्यांमधील मुलीशी लग्न झाले, त्यांना आठ मुले आहेत, त्यापैकी तीन मुलांना अनुवंशिक रोगांची लागण झाल्याचे समजले आहे. एका मुलाचा मेंदूचा पूर्णपणे विकास झालेला नाही एकाला बोलण्यात अडचणी येतात तर एकाला व्यवस्थित ऐकू येत नाही. गफूर हुसेन यांच्याशी घडलेल्या या परिस्थितीवरून नात्यांमध्ये विवाह केल्याने अनुवांशिक रोगांची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचे समजते.
इतर देशांपेक्षा पाकिस्तानात जवळच्या नात्यामध्ये जास्त लग्नसोहळे होत असल्याचे बघायला मिळते. त्यामुळे कुटुंबांमध्ये असलेल्या अनुवांशिक रोग पुढच्या पिढीला सहजरीत्या डिलिव्हर होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात ब्लड डिसऑर्डर थॅलेसेमिया नामक अनुवांशिक रोग मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे. तसेच पाकिस्तानात अनुवांशिक रोगांची पडताळणी करणाऱ्यांची संख्यादेखील नगण्य आहे. पाकिस्तानात असलेल्या रुग्णालयांमध्ये अनुवांशिक रोगांवर उपचार पद्धती उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
नात्यांमध्ये विवाह सोहळे लावले जातात याचे प्रमुख कारण म्हणजे इस्लाम धर्मात नात्यांमध्ये विवाह सोहळे करण्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानात चुलत भाऊ-बहीण किंवा मामे भाऊ-बहीण यांच्याशी विवाह केले जाण्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते. यामुळेच पाकिस्तानात अनुवांशिक रोगांची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे, याला आळा घालण्यासाठी पाकिस्तानाला त्यांच्या समाजास जागृक करणे आवश्यक आहे, अन्यथा पाकिस्तान भविष्यकाळात मोठ्या बिकट परिस्थितीत सापडू शकतो.
Published on: 11 February 2022, 03:53 IST