Others News

सिंचन विहीर मोटार अनुदान योजना percolation vihir motor scheme शासकीय अनुदानावर तुम्ही इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करू शकाल. विहिरीवरील सिंचन मोटरसाठी ऑनलाईन अर्ज करून शासकीय अनुदानावर मोटर खरेदी करता येते.

Updated on 31 March, 2022 11:18 PM IST

सिंचन विहीर मोटार अनुदान योजना percolation vihir motor scheme शासकीय अनुदानावर तुम्ही इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करू शकाल. विहिरीवरील सिंचन मोटरसाठी ऑनलाईन अर्ज करून शासकीय अनुदानावर मोटर खरेदी करता येते. तुमच्या शेतात सिंचन विहीर असेल आणि पाणी उपसा करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार हवी असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करा.

सिंचन विहीर मोटार अनुदान योजना

अनेक शेतकऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक सिंचन विहीर मोटार अनुदान योजनासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. त्या शेतकऱ्यांना ही योजना मंजूर झालेली आहे. त्या शेतकऱ्यांनी कसा अर्ज केला होता कोणकोणती कागदपत्रे अपलोड केली होती. किती रकमेची त्यांना पूर्वसंमती पत्र मिळाले आहे या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडीओ बघा. व्हिडीओची लिंक या लेकच्या सर्वात शेवटी दिलेली आहे. हा अर्ज ऑनलाईन कसा केला जातो कोणत्या वेबसाईटवर केला जातो कसा केला जातो.  

 हेही वाचा : सूर्यफुल अन् करडईचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर, जाणून घ्या कारण

शेतीला पाणी देण्यासाठी तुमच्याकडे सिंचन विहिर असेल तर पाणी उपसा करण्यासाठी त्यावर सिंचन मोटार बसविणे आवश्यक असते. इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप पैसे मोजावे लागतात. बऱ्याच शेतकरी बांधवांकडे या सिंचन मोटार खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. परिणामी विहिरीमध्ये पाणी असून देखील ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देवू शकत नाहीत.
अशावेळी तुम्ही शासकीय अनुदानावर इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना mahadbt web portal वर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा करावा लागतो, योजना मंजूर झाल्यावर कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.

 

इलेक्ट्रॉनिक सिंचन विहीर मोटार अनुदान मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

पाणी उपसा करण्यासाठी सिंचन सिंचन मोटार अनुदान मिळवायचे असेल तर खालीलप्रमाणे अर्ज करावा लागतो. खालील सांगितल्याप्रमाणे कृती करा.
 
•https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login हा web address सर्च केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महाडीबीटी शेतकरी पोर्टल ओपन होईल.
• युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगइन करा. आधार नंबरला लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर  otp घेवून देखील तुम्ही लॉगइन करू शकता.
• केल्यावर अर्ज करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
•सिंचन साधने व सुविधा या ऑप्शनवर क्लिक करा.
•तुमचा तालुका गाव आणि सर्व्हे क्रमांक या संदर्भातील संपूर्ण माहिती अगोरच तुम्हाला या ठिकाणी दिसेल जर हि माहिती दिसली नाही तर मन्युअलि टाका.
• घटक या पर्यायासाठी सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.
•बाबीमध्ये पंपसेट इंजिन व मोटर या पर्याय निवडा.
• क्षमतेचा सिंचन पंप तुम्हाला हवा आहे त्या संदर्भातील पर्याय निवडा.
• व अटीच्या स्वीकृतीसाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा.
•सर्वात शेवटी जतन करा या पर्यायावर क्लिक करा.
•अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
 

महाडीबीटी वेब पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी विविध योजना

महाडीबीटी वेब पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी विविध योजना असतात. ठिबक, तुषार, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर व इतर योजनांसाठी ऑनलाईन अर्ज केल्यास या योजनांचा लाभ शेतकरी बांधवाना मिळू शकतो. शेतकऱ्यांच्या आधार नंबरला त्यांचा मोबाईल नंबर लिंक असेल तर शेतकरी स्वतः देखील या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात. जर आधारशी मोबाईल लिंक नसेल तर मात्र बायोमेट्रिक पद्धतीने तुम्हाला आधार पडताळणी करावी लागेल ज्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जावे लागेल.

English Summary: Many have benefited from the well motor grant scheme online application
Published on: 31 March 2022, 11:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)