हि योजना आंबा पिकासाठी अधिसुचित अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, पुणे, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, परभणी, नांदेड, वाशिम, धुळे, बुलढाणा, जळगाव, नाशिक, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार या जिल्ह्यामधील, अधिसुचित तालुक्यातील, अधिसुचित महसूल मंडळात लागू आहे. या जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर शासनमान्य संदर्भ हवामान केंद्र आकडेवारी वरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते.
या योजनेतंर्गत आंबा पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पिक नुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
आंबा (ब) समाविष्ट जिल्हे: अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, वाशिम, जालना, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा.
विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी |
प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु.) |
अवेळी |
कोणत्याही सलग २ दिवस ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ६,०५०/- देय. |
कमी तापमान |
या कालावधीत दैनंदिन तापमान सलग ३ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई देय |
जास्त तापमान |
या कालावधीत दैनंदिन तापमान सलग ३ दिवस ४० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई देय रु. ३०,२५०/- राहील. |
वेगाचा वारा |
या कालावधीत कोणत्याही एक दिवस वारा २५ कि.मी.प्रती तास व त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ३६,३००/- राहील. |
एकूण विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर १,२१,०००/- |
|
गारपीट दि. १ फेब्रुवारी, २०२० ते |
रु. ४०,३३३/-, यासाठी नुकसान झाल्यास विमा धारक शेतकर्यांनी नुकसान झालेपासुन ४८ तासात नुकसानीची माहिती विमा कंपनी/कृषी विभागास कळविणे आवश्यक आहे. यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर अंतिम करण्यात येते. |
आंबा (क) समाविष्ट जिल्हे: नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर.
विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी |
प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु.) |
अवेळी पाऊस |
कोणत्याही सलग ३ दिवस ५ मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु.६,०५०/- देय. |
जास्त तापमान |
या कालावधीत दैनंदिन तापमान सलग ३ दिवस ३८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई देय रु. ३०,२५०/- राहील. |
वेगाचा वारा |
या कालावधीत कोणत्याही एक दिवस वारा २५ कि.मी.प्रती तास व त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ३६,३००/- राहील. |
कमी तापमान |
या कालावधीत दैनंदिन तापमान सलग ३ दिवस १० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई देय रु. १८,१५०/- राहील. |
एकूण विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर १,२१,०००/- |
|
गारपीट |
रु. ४०,३३३/-, यासाठी नुकसान झाल्यास विमा धारक शेतकर्यांनी नुकसान झालेपासुन ४८ तासात नुकसानीची माहिती विमा कंपनी/कृषी विभागास कळविणे आवश्यक आहे. यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर अंतिम करण्यात येते. |
आंबा ब आणि क पिकासाठी योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक: ३१ डिसेंबर २०१९.
शेतकर्यांसाठी विमा हप्ता:
हवामान धोके |
विमा संरक्षित रक्कम (रुपये प्रती हेक्टर) |
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता (रुपये प्रती हेक्टर) |
अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान, |
१,२१,०००/- |
६,०५०/- |
गारपीट |
४०,३३३/- |
२,०१७/- |
योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा:
समाविष्ट जिल्हे |
विमा कंपनीचे नाव व पत्ता |
समूह- १: सोलापूर, अहमदनगर, जालना, पुणे, पालघर, सातारा, नांदेड, नागपूर, यवतमाळ. |
भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड. |
शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग:
- विविध वित्तीय संस्थांकडून ज्यांनी अधिसूचित फळपिकासाठी पिक कर्ज घेतले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील. मात्र गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक आहे.
- बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे.
- फळ पिकाखालील किमान २० हेक्टर किंवा जास्त उत्पादनक्षम क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात ही योजना राबविण्यात येते, मात्र सदर मंडळ शासनामार्फत अधिसूचित होणे आवश्यक असते.
या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी Common Service Centre (CSC) मार्फत ऑनलाईन अर्ज भरावेत, सोबत ७/१२, आधार कार्ड, बँक खाते तपशील असणे आवश्यक आहे. अधिक महितीसाठी भारतीय कृषी विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in कडे संपर्क साधून अधिक सविस्तर माहिती घ्यावी.
लेखक:
श्री. विनयकुमार आवटे
(अधिक्षक कृषी अधिकारी, मनरेगा, पुणे विभाग)
9404963870
Published on: 28 November 2019, 04:29 IST