Others News

जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhanmantri kisan Sanman Nidhi) योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) बनवणे खूपच सोपे आहे. परंतु बरेच किसान किसान क्रेडीट कार्डच्या बाबतीत असलेल्या बँकेच्या धोरणाबद्दल त्रस्त आहेत. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, बँक किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी किंवा देण्यासाठी टाळाटाळ करतात.

Updated on 27 May, 2021 5:40 PM IST

जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhanmantri kisan Sanman Nidhi) योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) बनवणे खूपच सोपे आहे. परंतु बरेच किसान किसान क्रेडीट कार्डच्या बाबतीत असलेल्या बँकेच्या धोरणाबद्दल त्रस्त आहेत. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, बँक किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी किंवा देण्यासाठी टाळाटाळ करतात.

जर तुम्हाला एखादी बँक तुम्ही पात्र असताना किसान क्रेडिट कार्ड देत नसेल तर तुम्ही त्या बाबतीतली तक्रार करू शकता. याबाबत आपण या लेखात  माहिती घेऊ.

 किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठीची प्रक्रिया

 केंद्र सरकारने पी एम किसान योजनेसोबत किसान क्रेडिट कार्ड लाही जोडले आहे. म्हणजेच जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजने द्वारे वर्षाला सहा हजार रुपये घेतात, अशा शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बनवणे सोपे आहे. यामधून शेतकऱ्यांना चार टक्के दराने तीन लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. ही प्रक्रिया पाहताना सगळ्यात आगोदर पी एम किसान ची ऑफिशियल साईट https://pmkisaan.gov.in/ वर जाऊन त्याच्या अगोदर किसान क्रेडिट कार्ड चा फॉर्म डाउनलोड करावा. या फॉर्ममध्ये जमिनीचे कागदपत्रांची  माहिती तसेच पिकांची तपशीलवार माहिती भरावी लागते. तसेच तुम्ही या अगोदर कोणत्याही बँक मधून किसान क्रेडिट कार्ड घेतले नाही याबद्दलची माहितीही भरावी लागते. हा अर्ज भरल्यानंतर तो सबमिट करावा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या संबंधित बँकेत किसान क्रेडिट कार्ड मिळते.

 

किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

 आयडी प्रूफ साठी मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी  आवश्यक असते तसेच ऍड्रेस प्रूफ साठी मतदान कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी लागते.

 केसीसी संबंधी तक्रार कुठे करावी?

 रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन नुसार, शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत हे कार्ड देणे बंधनकारक आहे. जर पंधरा दिवसांपर्यंत  कार्ड इशू नाही केले गेले तर तुम्ही बँकेच्या विरोधात तक्रार दाखल करू शकता. त्यासाठी तुम्ही बँक लोकपाल कडे तक्रार दाखल करू शकता. तसेच रिझर्व बँक अधिकृत वेबसाईट ची लिंक https://cms.rbi.org.in/ वर विजिट करू शकता.तसेच किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाइन नंबर  0120-6025109/155261 वर तक्रार दाखल करू शकता. तसेच ग्राहक ई-मेल (pmkisan-ict@gov.in) च्या माध्यमातून हेल्पडेस्क शी संपर्क करू शकता.

 

केसीसी शेतीसाठीच उपयोगी नाही तर पशुपालन व मत्स्य पालन यासाठी सुद्धा या योजनेद्वारे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. शेती, मत्स्यपालन आणि पशुपालन  करणारा कोणताही व्यक्ती, तसेच संबंधित व्यक्ती दुसऱ्याची शेती करत असेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतो. यासाठी वयाची अठरा वर्षे तर जास्तीत जास्त 75 वर्षे आहे. या योजनेद्वारे तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज सात टक्के दराने मिळते. जर हे घेतलेले कर्ज वेळेवर भरले तर यामध्येतीन टक्क्यांची सूट दिली जाते.म्हणजे शेतकऱ्यांना हे कर्ज फक्त चार टक्के दराने पडते.

English Summary: Making KCC for PM farmer beneficiaries is easy; If the bank is paying you can complain
Published on: 27 May 2021, 05:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)