Others News

भारतात पेट्रोलचे दर गगनाला भिडलेत, राज्यात पेट्रोल ने केव्हाच शंभरी पार केली आहे. मालेगाव तालुक्यात पेट्रोलचे दर 110 रुपयाच्या घरात आहेत. त्यामुळे आता लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे अधिक पहायला मिळत आहे. भारतातच नव्हे तर जगातील इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मध्ये कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पेट्रोल व डिझेलच्या वाहनांमुळे प्रदूषण हे कमालीचे वाढते, त्यामुळे प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी आता इलेक्ट्रिक वाहनांना लोक पहिली पसंती दर्शवीत आहेत, आणि हे बऱ्याच अंशी योग्य आहे. म्हणूनच की काय आता बऱ्याचशा कंपन्या आपल्या वाहनांना इलेक्ट्रिक करण्याकडे लक्ष लावीत आहेत.

Updated on 20 December, 2021 5:40 PM IST

आणि अनेक कंपन्यांनी आपली वाहने इलेक्ट्रिक केलीत सुद्धा. इलेक्ट्रिक वाहन आपल्या पेट्रोलचा खर्च हा डायरेक्ट शून्य करून ठेवते. पण अनेक लोकांनी आपल्या बाईक पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या विकत घेतल्या आहेत पण आता यावरही सोल्युशन निघाले आहे आता आपल्या जुन्या बाईक ला देखील इलेक्ट्रिक करता येणे शक्य आहे. हो मित्रांनो हे आता शक्य आहे याच्यासाठी आपणास फक्त एक इवी किटची आवश्यकता भासते, यात चिंतामणी द्वारे चालणाऱ्या इंजिनच्या जागेवर कन्वर्जन किट बसवून दिले जाते.

गेल्या आठवड्यात कार साठी देखील एक कन्वर्जन किट बाजारात उपलब्ध करण्यात आले, तर मोटरसायकल साठी इलेक्ट्रिक किट हे मागच्या महिन्यातच बाजारात उपलब्ध झाले आहे. एका ठाण्याच्या कंपनीने मागच्या महिन्यात मोटरसायकल साठी एक इवी कन्वर्जन किट लॉंच केले होते विशेष म्हणजे या किटला आरटीओने परवानगी देखील दिली आहे. या कंपनीचे नाव इवी गोगोए1 असे आहे. जर आपण आपल्या मोटरसाइकिलला देखील या किटचा वापर करून इलेक्ट्रिक करू इच्छित असाल तर आपणास 35 हजार रुपये मोजावे लागणार आहेत, तसेच सहा हजार तीनशे रुपये एक्सट्रा जीएसटी देखील भरावी लागणार आहे. या किटची अजून एक विशेषता म्हणजे याला तीन वर्षांची वॉरंटी देखील देण्यात येत आहे. आणि जर आपणास सिंगल चार्ज मध्ये 151 किलोमीटर धावणारी मोटरसायकल बनवायची असेल तर आपणास एक अपूर्ण बॅटरी पॅक घ्यावा लागेल आणि यासाठी आपणास 95 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

एकंदरीत जर आपणही पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण असाल तर आपण देखील या किटचा वापर करून पेट्रोल-डिझेलचा अवाजवी खर्च कमी करू शकता. पण यासाठी आपणांस जवळपास 1 लाख रुपये खर्च हा करावा लागणार आहे, मात्र या इवी किटची सर्वात महत्वाची विशेषता म्हणजे याला आरटीओने अपूर्वल दिलेले आहे.

English Summary: make your old splendor bike electric with this ev kit
Published on: 20 December 2021, 05:40 IST