Others News

आपल्या शिवारात वीज नसेल तर पिकांना पाणी देण्यासाठी विलंब होत असतो. पिकांना पाणी देण्यास विलंब झाला तर होणाऱ्या उत्पादनाला मुकावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. शेतकऱ्यांची ही बाजू लक्षात घेत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा विचार मोदी सरकारने केला आहे. यासाठी सरकारने कुसूम योजना सुरू केली आहे.

Updated on 12 March, 2020 2:28 PM IST


वीज नसेल तर पिकांना पाणी देण्यासाठी विलंब होत असतो. पिकांना पाणी देण्यास विलंब झाला तर होणाऱ्या उत्पादनाला मोकावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. शेतकऱ्यांची ही बाजू लक्षात घेत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा विचार मोदी सरकारने केला आहे. यासाठी सरकारने कुसूम योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप दिला जाणार आहे.शेतात हा सोलर पंप बसविण्यासाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना ग्रिडशी जोडण्यासह सोलर पंप देण्यासाठी आर्थिक साहाय्य करू, अशी घोषणा केली होती.

मोदी सरकारने आपल्या मागच्या कार्यकाळात २०१९ मध्ये पंतप्रधान कुसूम योजनेची सुरुवात केली होती. त्यासाठी ३४ हजार ४२२ रुपयांची तरतूद केली होती. सिंचन करताना ऊर्जा उत्पन्न करता यावी, यासह शेतकरी अतिरिक्त वीज सरकारला विकू शकतात. त्यातून त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. सौर ऊर्जा लावण्यासाठी भारत सरकारकडून ६० टक्के रक्कम दिली जाणार आहे. समजा तुम्हाला सौर ऊर्जा लावयाची आहे. जर त्याला येणारा खर्च हा १ लाख रुपये आहे. तर सरकारकडून ६० हजार रुपये दिले जातील. या योजनेमुळे शेतकरी सौर ऊर्जा उत्पादित करुन ग्रीड विकण्यास त्यांना सक्षम बनत आहेत. कोरडवाहू जमिनीवरही आपण कुसूम योजनेचा लाभ घेऊ शकता. या जमिनीवर सौर ऊर्जा उत्पादित करुन पैसे कमावू शकता.

कुसूम योजनेची पात्रता

  • अर्ज करणारा हा शेतकरी असावा.
  • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक.
  • अर्ज करण्यासाठी बँक खाते नंबर असणे आवश्यक.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • बँक खाते पुस्तक(पासबुक)
  • मोबाईल नंबर
  • पुरव्यासाठी पत्ता
  • पासपोर्ट आकारातील फोटो

ऑनलाईन अर्ज कसा कराल

  • सर्वात आधी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर पेज ओपन होईल.
  • होम पेजवर आपली नोंदणीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करुन आपला अर्ज करा. त्यात आपले नाव, पत्ता. आधार नंबर, मोबाईल नंबर आदींची माहिती भरावी.
  • सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी सबमिट या बटणांवर क्लिक करा.
  • नोंदणी झाल्यानंतर आपल्याला सौर पंप सेटसाठी १० टक्के लागणारा खर्च जमा करण्याची सुचना मिळते. त्यानंतर काही दिवसातच आपल्या शेतात सोलर पंप बसवला जातो.
      
English Summary: make online application for PM Kusum scheme
Published on: 12 March 2020, 12:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)