Others News

देशातील सर्वसामान्य गरीब जनतेला दवाखान्यात उपचारासाठीखर्च करण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंतचे आर्थिक मदत दिली जाते. हे कार्ड तयार करण्यासाठी अगोदर तीस रुपये शुल्क भरावे लागत होते. परंतु आता कोरोना काळामध्ये सरकारने या मध्ये दिलासादायक निर्णय घेतला की आता कोणताही व्यक्ती आयुष्यमान भारत कार्डविनामूल्य मिळू शकते आणि उपचारासाठी आर्थिक लाभ देऊ शकता.

Updated on 22 April, 2021 11:51 PM IST

 हे कार्ड कसे बनवावे?

 आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी तुम्ही शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधू शकता किंवा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकता. एकदा तुमची नोंदणी झाली तर मोहिमेची संबंधित कर्मचारी आपल्या घरी येतील आणि संपूर्ण तपशील घेतील.  हे कार्ड एटीएम कार्ड सारखी दिसते,, तसेच ते खराब होत नाही. आता ते कार्ड विनामूल्य दिले जाईल.

30 एप्रिल पर्यंत विनामूल्य आयुष्यमान  कार्ड बनवण्याची मुभा

 आयुष्यमान कार्ड फ्री बनवण्यासाठी सरकारकडून एक विशेष मोहीम राबवली जाते.  त्या मोहिमेअंतर्गत 30 एप्रिल पर्यंत तुम्ही या या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतची वैद्यकीय सुविधा मिळण्याची तरतूद आहे.  हे कार्ड गोल्डन कार्ड म्हणून देखील ओळखली जातेआयुष्यमान भारत योजना अंतर्गत कार्डधारकांना त्यांच्या आजारावर सरकारी रुग्णालयात उपचार करता येतात.  

या माध्यमातून त्यांना उपचारासाठी विमा चे पैसे मिळू शकतील. या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला उपचारासाठी पाच लाख रुपये दिले जातात.

English Summary: Make ayushman bharat card without cost, get five lakh for treatment
Published on: 22 April 2021, 11:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)